शाळेत वेळेवर न पोहचणे भोवले : जळगाव जिल्ह्यातील केंद्र प्रमुख व चार शिक्षकांच्या वेतन कपातीसह वेतन वाढ रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 12:50 PM2019-04-04T12:50:05+5:302019-04-04T12:50:57+5:30

धानोरा जि.प. शाळेतील शिक्षकांचा समावेश

No progress has been reached in school: Salary increase in Jalgaon district, including center head and four teachers' deductions | शाळेत वेळेवर न पोहचणे भोवले : जळगाव जिल्ह्यातील केंद्र प्रमुख व चार शिक्षकांच्या वेतन कपातीसह वेतन वाढ रोखली

शाळेत वेळेवर न पोहचणे भोवले : जळगाव जिल्ह्यातील केंद्र प्रमुख व चार शिक्षकांच्या वेतन कपातीसह वेतन वाढ रोखली

Next

जळगाव : विद्यार्थी शाळेत येऊन थांबलेले असताना सकाळी साडे आठ वाजले तरी शाळा बंद असल्याचे आढळून आल्याने धानोरा बु., ता. जळगाव येथील जि.प. शाळेच्या चार शिक्षकांसह केंद्र प्रमुखांचे एक महिन्याचे वेतन कपात करण्यासह एक वेतनवाढ कायम स्वरुपी रोखण्याचे आदेश गट विकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी बुधवारी सकाळी ७.५५ वाजता धानोरा बु. जि.प. शाळेस भेट दिली असता त्या ठिकाणी विद्यार्थी आलेले दिसले मात्र, शाळा खोल्या बंद असल्याचे आढळून आले. त्या वेळी त्यांनी तत्काळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन. पाटील यांना या बाबत माहिती कळविली. त्या नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी लगेच शिक्षणाधिकाऱ्यांना (प्राथमिक) या प्रकाराबद्दल कळविले. त्यांनी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना माहिती देऊन शाळेला भेट देण्याच्या सूचना केल्या.
गटशिक्षणाधिकारी धानोरा येथे पोहचले असता सकाळी साडे आठ वाजले तरी शाळा उघडलेली नसल्याचे आढळून आले. या प्रकाराची शिक्षण विभागासह मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन. पाटील यांनी गंभीर दखल घेत शाळेच्या शिक्षकांसह केंद्र प्रमुखांचे एक महिन्याचे वेतन कपात व एक वेतन वाढ कायम स्वरुपी बंद करण्याचे आदेश गट विकास अधिकाºयांनी काढले.
यामध्ये शिरसोली केंद्राचे केंद्रप्रमुख दत्तू नामदेव ठाकूर, धानोरा बु. शाळेचे शिक्षक शालीग्राम बळीराम पाटील, रत्नप्रभा रामकृष्ण वाणी, ताई कौतिक पाटील, कल्याण सुधाकर पाटील यांचा समावेश असून या आदेशाची नोंद संबधितांच्या मूळ सेवा पुस्तिकेत करण्याचे आदेशही गटविकास अधिकाºयांनी दिले आहे.
विद्यार्थी थांबले बाहेर
धानोरा बु. शाळेत सकाळी विद्यार्थी येऊन थांबलेले होते तरीदेखील वर्ग खोल्या उघडलेल्या नसल्याचा प्रकार बुधवारी घडला. जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील हे शाळेत पोहचले त्या वेळी विद्यार्थी त्यांना बाहेरच दिसले. त्या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत बंद वर्गखोल्यांसमोर छायाचित्रदेखील काढले.

Web Title: No progress has been reached in school: Salary increase in Jalgaon district, including center head and four teachers' deductions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव