हेल्मेट न वापरणा:या 9 हजार जणांवर कारवाई

By admin | Published: February 9, 2017 12:25 AM2017-02-09T00:25:28+5:302017-02-09T00:25:28+5:30

वाहतूक शाखेची कारवाई : साडे अकरा लाखाचा दंड केला वसूल

No use of helmets: 9 thousand people to be tried | हेल्मेट न वापरणा:या 9 हजार जणांवर कारवाई

हेल्मेट न वापरणा:या 9 हजार जणांवर कारवाई

Next

जळगाव : महामार्गावरील अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे हेल्मेट व सीट बेल्ट न वापरणा:या वाहनधारकांविरुध्द वर्षभर वेळोवेळी कारवाईची मोहीम राबविण्यात आली. त्यात जानेवारी ते डिसेंबर 2016 या कालावधीत 9 हजार 119 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 11 लाख 59 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
हेल्मेट व सीट बेल्टची कारवाई ही मुख्यत: जळगाव शहर व महामार्गावरच करण्यात आली आहे. महामार्गावर वेळोवेळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वारांचा बळी गेला आहे, त्यात दुचाकीस्वाराकडे हेल्मेट नसल्याने तर काही अपघातात हेल्मेट असूनही त्याचा वापर न केल्याचे निष्पन्न झाले होते. अनेक घटनांमध्ये हेल्मेटमुळे जखमींचा जीव वाचला आहे. हेल्मेटची गरज लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी शहर वाहतूक शाखेतर्फे हेल्मेटसाठी स्वतंत्र मोहीम राबविली. अनेक दुचाकीस्वार तरुणांच्या ताब्यातील दुचाकी वाहतूक शाखेच्या कार्यालयात जप्त करण्यात आल्या.कारवाईच्या मोहीमेत 8 हजार 229 कार चालकांवर सीट बेल्ट न वापरल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून वर्षभरात 10 लाख 69 हजार 909 रुपये तर 890 दुचाकीस्वारावर विना हेल्मेटची कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 89 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दंडाच्या रकमेत दुपटीने वाढ
केंद्रीय परिवहन मंत्रालयाने नवीन वर्षापासून विविध प्रकारच्या दंडाच्या रकमेत दुपटीने वाढ केली आहे. आरटीओच्या नियमात तर पाच ते सहा पटीने वाढ झाली आहे. विना लायसन्सचा शंभर रुपयांचा दंड हा दोनशे रुपयांवर तर तीनशे रुपयांचा दंड 900 रुपयांर्पयत पोहचला आहे. जास्तीच्या रकमेमुळे वाहनधारकांना दंडाची रक्कम भरण्यापेक्षा तितक्या रकमेत हेल्मेट घेणे परवडणारे आहे, शिवाय स्वत:ची सुरक्षितता राखता येईल.

हेल्मेटशिवाय प्रवेश नाही
जैन उद्योग समूह, सुप्रीम पाईप, रेमंड यासह अनेक मोठमोठय़ा कंपन्यांनी कर्मचा:यांसाठी हेल्मेट सक्ती केली आहे. हेल्मेट नसेल तर कंपनीत प्रवेश दिला जात नाही. महामार्गाला लागून असलेल्या सर्व कपंनीशी पोलिसांनी पत्रव्यवहार केल्याने त्यांनी कर्मचा:यांसाठी हेल्मेट सक्ती केली आहे. त्यामुळे या तीन दिवसात हेल्मेटला प्रचंड मागणी वाढली आहे.

हेल्मेट खरेदीसाठी गर्दी वाढली
पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी महामार्ग व राज्य मार्गावर हेल्मेट सक्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर हेल्मेट खरेदीसाठी शहरातील दुकानांमध्ये वाहनधारकांची गर्दी होवू लागली आहे. महिन्याला एका दुकानातून 8 ते 10 हेल्मेटची विक्री होत असताना आता दिवसाला हा आकडा 40 ते 40 च्या घरात गेला आहे, त्यावरुन हेल्मेट मागणी किती वाढली याचा अंदाज येतो.
 हेल्मेट विक्रेते गोपाळ वालेचा यांच्या माहितीनुसार, या आठवडय़ापासूनच हेल्मेटची मागणी वाढली आहे. 300 ते 1 हजार 800 रुपयांर्पयत हेल्मेटच्या किमती आहेत. दिल्ली उत्पादीत नॉन आयएसआयचे हेल्मेट 350 रुपयांर्पयत उपलब्ध आहे व याच हेल्मेटला अधीक मागणी आहे. सरकारी नोकरदार किंवा खासगी कंपन्यात मोठय़ा पदावर असलेल्या अधिकारी व कर्मचा:यांकडून मात्र ब्रॅँडेड हेल्मेटचीच खरेदी केली जात आहे.
कंपनी व डिलर्सला देणार पत्र
 दुचाकीला हेल्मेटसाठी लॉक असलेली सुविधा उपलब्ध करुन द्यावी यासाठी उत्पादन करणा:या कंपन्या व त्यांचे जिल्ह्यातील डिलर्स यांना पत्र दिले जाणार आहे. भविष्यात हेल्मेटशिवाय दुचाकी पासिंग करु नये याबाबतही पावले उचलली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी दिली.

प्रत्येक वेळी कायद्याचा बडगा दाखवून कारवाई करणे हा पर्याय नाही. हेल्मेट ही जनचळवळ झाली पाहिजे. लोकांचा जीव वाचावा हाच आमचा उद्देश आहे. सुरक्षा सप्ताहात पोलिसांच्या वतीनेच महामार्गावर हेल्मेट वाटप करण्यात आले होते. आताही सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. जनतेकडूनच या मोहीमेला प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा आहे. शुक्रवारपासून महामार्ग व राज्यमार्गावर हेल्मेटसक्तीची अमलबजावणी केली जाणार आहे.
 - डॉ.जालिंदर सुपेकर,
                  पोलीस अधीक्षक
 

Web Title: No use of helmets: 9 thousand people to be tried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.