नोंदणी करून लस मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:11+5:302021-06-22T04:13:11+5:30
भुसावळ : रुग्णवाहिकेची काच फोडली भुसावळ : नोंदणी केल्यानंतरही ग्रामीण रुग्णालयात लस मिळत नसल्याचा ...
भुसावळ : रुग्णवाहिकेची काच फोडली
भुसावळ : नोंदणी केल्यानंतरही ग्रामीण रुग्णालयात लस मिळत नसल्याचा राग आल्याने एकाने वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर नितीन चौधरी व सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली. तसेच रुग्णवाहिकेची काच फोडली. ही घटना २१ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास साकेगाव ग्रामीण रुग्णालयात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार रवी छाबडिया (३२, रा. सिंधी कॉलनी) यांनी लसीकरणासाठी नाव नोंदणी केली. त्यानुसार ते सोमवारी दुपारी रुग्णालयात
लस घेण्यासाठी आले. तिथे त्यांना त्यांची रिक्वेस्ट सबमिट झाली नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत छाबडिया यांना राग आला व यातूनच वैद्यकीय
अधिकारी डॉ. मयूर चौधरी, सुरक्षा रक्षक व कर्मचारी यांच्यात वाद झाला. या वादातून बाहेर उभ्या असलल्या रुग्णवाहिकेची उजव्या बाजूची काच फोडण्यात आली.
माजी नगरसेवक निकी बात्रा यांनी दोघांमध्ये समजोता घडविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाइल बंद होता.
कोट
घटना घडली आहे. मात्र याबाबत अद्यापही गुन्हा दाखल नाही.
- रामकृष्ण कुंभार, पोलीस निरीक्षक.
कोट
आपण कुणालाही शिवीगाळ केली नाही. लस घेतली नसताना लस घेतल्याचा संदेश आला. त्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलो असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीच वाद घातला.
- रबी छाबडिया, भुसावळ