ना वखरटी, ना नांगरटी तरीही पिक दमदार
By admin | Published: July 8, 2017 02:01 PM2017-07-08T14:01:48+5:302017-07-08T14:01:48+5:30
निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांनी आधुनिक शेतीचा ध्यास घेतला आहे.
Next
ऑनलाईन लोकमत / अजय कोतकर
गोंडगाव, जि. जळगाव, दि.8 - ता.भडगाव : भोरटेक येथील शेतकरी संजय बळीराम महाजन हे तीन-चार वर्षापासून शेतीची कुठल्याही प्रकारे मशागत अथात े ना वखरटी ना नांगरटी करीत नसून तरीही उत्तम पिक मिळत असल्याचे ते सांगतात.
निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांनी आधुनिक शेतीचा ध्यास घेतला आहे. मागील वर्षी हळद, मका, ज्वारी हे पीक घेतले. त्यात हळदीचे उत्पन्न दीड लाखाचे (एक एकर शेतीत) तर मका देखील सव्वा लाखाचा झाला. हे पीक घेतल्यावर त्यांनी कुठलीही मशागत केली नाही. ज्या स्थितीत शेती त्यातच त्यांनी आता कपाशीची लागवड केली आहे. गतवर्षी देखील रोपटे पध्दतीने ऊसाची लागवड केली होती. आपल्याकडे रोपटे पध्दतीने कधीही ऊस लागवड होत नाही. पण त्यांनी केली आणि ते पीक आता जोमाने बहरत आहे. ते रोज शेतक:यांना मार्गदर्शन करतात. कुठलीही फी घेत नाही. त्यामुळे भडगाव कृषी विभागातर्फे मागे त्यांना कृषीमित्र हा पुरस्कार देवून त्यांना सन्मानित केले.
खर्चाची होते बचत
शेतकरी हा मेमध्येच शेतीची मशागत करतो. हा महिना शेतक:याचा धावपळीचा असतो. मजूर मिळत नाही, ट्रॅक्टर ट्रीलर मारण्यास मिळत नाही, वखरटी, नांगरटी करणारा मिळत नाही. यासाठी अतोनात खर्च होतो व पाहीजे तसे उत्पन्न मिळत नाही. शेती मशागतीसाठीच जवळपास 4 ते 5 हजार रुपयार्पयत खर्च येतो. मात्र महाजन यांच्या पद्धतीने तो खर्च शेतक:याचा होत नाही.
ट्रॅक्टरद्वारे नांगरटी केली तर एका एकर शेतीला 1500 रु., रोटर मारणे- एक एकर- 1000 रु. , स:या पाडणे - 1000 रु. असा एक एकर शेतीला 3500 रु. खर्च होतो तर तीन एकर शेतीला 10,500 रु. खर्च त्यांना आला असता तो त्यांनी केला नाही, असे ते सांगतात, याअगोदर मका पीक घेतले होते. त्यात कपाशी लावली. मकाचे जे खोड आहे त्याला खाली गांडूळ लागले म्हणजेच आपोआप गांडूळ खत तयार होते व ते गांडूळ नव्या पिकाकडे आकर्षित होतात, असेही महाजन यांनी सांगितले.
70 टक्के सेंद्रीय शेती
संजय महाजन हे रासायनिक शेतीबरोबरच सेंद्रीय शेतीही करतात. 70 टक्के सेंद्रीय तर 30 टक्के रासायनिक शेती ते करतात. एवढे असूनही ते 20 गायींचा सांभाळ करतात. म्हैस नसल्याचे ते ठामपणे सांगतात. म्हैस ही जास्त उत्पन्न देणरे साधन आहे परंतु मी शेतीतून अधिक उत्पन्न काढतो. यामुळे मी लक्ष्मीच्या रुपात आजही 20 गायींचा सांभाळ करीत आहे, असेही ते म्हणाले.
याबाबत महाजन यांनी सांगितले की, मी कोल्हापूर येथे कृषी प्रदर्शनासाठी गेलो होतो. त्यावेळी तेथील शेतकरी चिपळूणकर यांचे ‘विना नांगरटी वखरटीची शेती’ हे पुस्तक घेवून त्याचा अभ्यास करुन मी प्रथम प्रयोग केला. 2014 मध्ये बाजरी मका या पिकानंतर दोन एकर शेतीत कपाशी लागवड केली तर दोन एकर शेतीत 20 क्विंटल उत्पन्न मला मिळाले. यावरुन मी परिसरातील शेतक:यांनाही याचे मार्गदर्शन करतो.
ना नांगरटी ना वखरटी या प्रयोगाने गांडूळ सेंद्रीय खत तयार होवून अन्नद्रव्य पुरवठय़ाचे काम त्याद्वारे केले जाते. गांडूळामुळे जमीन भुसभुशीत होते. पाण्याचा ओलावा जमिनीत टिकून राहतो. पिकास पोषक निर्मिती जमिनीत होत, असे कृषीतज्ज्ञ विजय जयवंत पाटील यांनी सांगितले.