प्रवासाच्या परवानगीसाठी नोडल अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 12:42 PM2020-05-03T12:42:44+5:302020-05-03T12:43:20+5:30

कण्टेनमेण्ट झोनमधील नागरिकांना मात्र कोणतीही परवानगी नाही

Nodal officer for travel permission | प्रवासाच्या परवानगीसाठी नोडल अधिकारी

प्रवासाच्या परवानगीसाठी नोडल अधिकारी

Next

जळगाव :  लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातून ज्या नागरिकांना परराज्यात अथवा इतर जिल्ह्यामध्ये जायचे असेल त्यांना आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून यासाठी नोडल अधिकाºयांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत. दरम्यान, कण्टेनमेण्ट झोनमधील नागरिकांना जाता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
लॉकडाउनमुळे अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार गेल्या दीड महिन्यापासून अडकून पडलेल्या नागरिकांचा आपल्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यासाठी ज्या नागरिकांना जिल्ह्णाबाहेर जायचे असेल त्यांना अर्ज करावा लागणार आहे. यासाठी आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच यासाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) रवींद्र भारदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  तसेच बाहेरून जिल्ह्यात येणाºया नागरिकांच्या माहितीसाठी नोडल अधिकारी म्हणून विशेष भूसंपादन अधिकारी किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली
आहे.
कण्टेनमेण्ट झोनमधील नागरिकांना पर जिल्ह्यात जाण्याची परवानगी राहणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे. ज्या व्यक्तींना कोरोना किंवा इंफ्लूएन्झा सारखी लक्षणे नाहीत त्यांनाच केवळ प्रवासाची परवानगी दिली जाईल, लक्षणे असल्यास निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहे. 

Web Title: Nodal officer for travel permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव