निवृत्त शिक्षकांबाबत अनास्था का....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:43 PM2019-07-20T12:43:05+5:302019-07-20T12:43:44+5:30

गेली कित्येक वर्षे जळगाव मनपा अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांच्या बाबतीत अन्याय सुरू आहेत. ८-१० वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या शिक्षकांना पेन्शन विक्रीची ...

Non-teaching about retired teachers ... | निवृत्त शिक्षकांबाबत अनास्था का....

निवृत्त शिक्षकांबाबत अनास्था का....

googlenewsNext

गेली कित्येक वर्षे जळगाव मनपा अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांच्या बाबतीत अन्याय सुरू आहेत. ८-१० वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या शिक्षकांना पेन्शन विक्रीची मंजुरी मिळाली नाही. मनपाच्या इतर कर्मचाऱ्यांबाबतीत ही वस्तुस्थिती नाही. मग मनपा शिक्षण मंडळाबाबतीत असे का ?
गेला काही वर्षे निवृत्त शिक्षकांच्या निवृत्ती वेतनाबाबतही बेपर्वाईचे धोरण अवलंबविले जात आहे. कहर म्हणजे २०१६ चे पेन्शनचे दोन हप्ते अजून अदा केले गेले नाही. २०१९ मध्ये केवळ जानेवारीचे निवृत्ती वेतन अदा केले आहे. काही वर्षांपूर्वी मनपा शिक्षण संघटनेने उच्च न्यायालयात या अनुषंगाने केस ही दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ही निवृत्ती वेतनाचे रडगाणे संपलेले नाही. महागाईच्या या काळात, पेन्शन प्रत्येक निवृत्त वेतनधारकांना आधार वाटते. पण तोच आधार प्रशासनाकडून हिसकावला जात आहे. मनपा निवडणुकीनंतर, नव्या राजकर्त्यांकडून खूप काही अपेक्षा होत्या. जळगाव ते मुंबई एकच पक्षाचे सरकार असल्याने निवृत्त शिक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत होत्या. पण आता वाटते की, मंझिल अभी दूर है. निवृत्त शिक्षकांच्या अनेक गरजा, अडीअडचणी असतात. आधीच निवृत्तीनंतर शिक्षकांना १०-१० वर्षे, पेन्शन विक्रीच्या रकमा मिळाल्या नाहीत. काहींनी न्यायालयाच्या मार्गाने रकमा मिळविल्या अजून अनेकांना पेन्शन विक्री मिळाली नाही. हा अन्याय नव्हे काय ? तरी आयुक्तांनी सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासह सहकार्याचा हात पुढे करावा व त्यांना उर्वरित जीवन समाधानात जगण्यासाठी मदत करावी.
-रशीद शेख कासमी, अमन पार्क, शिवाजीनगर, जळगाव.

Web Title: Non-teaching about retired teachers ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव