दीडशे तपासणीत एकही बाधित नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:16 AM2021-01-22T04:16:00+5:302021-01-22T04:16:00+5:30
जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये मंगळवारपासून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून मंगळवारचे अहवाल गुरूवारी प्राप्त झाले आहेत. यात एकही ...
जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये मंगळवारपासून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून मंगळवारचे अहवाल गुरूवारी प्राप्त झाले आहेत. यात एकही व्यापारी, विक्रेता, कामगार बाधित नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यात ३७ नवे रुग्ण आढळून आले आहे. यात १६ रुग्ण हे जळगाव शहरातील आहे.
जिल्ह्यात दोन बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून यात जळगाव शहरातील एका ८१ वर्षीय बाधित वृद्धाचा समावेश आहे. अहवालांची संख्या वाढली असून प्रलंबित अहवालांची संख्या ७८६ वर पोहोचली. शुक्रवारी २९१ ॲंटीजेन चाचण्या झाल्या तर आरटीपीसीआरचे ९६१ अहवाल प्राप्त झाले आहेत. यात अनुक्रमे १३ आणि २४ जण बाधित आढळून आले आहेत. तर ४७ जणांना घरी सोडण्यात आले आहेत.
जळगावचे मृत्यू ३८०
जळगाव तालुक्यातील मृतांची संख्या ३८० वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त मृत्यू हे जळगाव तालुक्यात झाले आहेत. यात जळगाव शहरातील २९७ बाधितांचा समावेश आहे.