उमविचा ‘कन्सोर्टियम’ प्रकल्पामध्ये समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 10:01 PM2017-08-18T22:01:27+5:302017-08-18T22:07:23+5:30
पोलंड, पोतुर्गाल, सायप्रस, स्लोव्हाकिया व बेल्जियम या पाच युरोपियन देशातील प्रत्येकी एक विद्यापीठ व भारतातील पाच विद्यापीठे यांचा समावेश असलेल्या ‘इरास्मस प्लस’ या युरोपियन देशांच्या योजनेद्वारे साकारणाºया कन्सोर्टियम प्रकल्पामध्ये उमविचा समावेश झाला आहे. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.
आॅनलाईन लोकमत,
जळगाव-दि.१८,पोलंड, पोतुर्गाल, सायप्रस, स्लोव्हाकिया व बेल्जियम या पाच युरोपियन देशातील प्रत्येकी एक विद्यापीठ व भारतातील पाच विद्यापीठे यांचा समावेश असलेल्या ‘इरास्मस प्लस’ या युरोपियन देशांच्या योजनेद्वारे साकारणाºया कन्सोर्टियम प्रकल्पामध्ये उमविचा समावेश झाला आहे. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.
सप्टेंबर, २०१५ मध्ये माजी कुलसचिव प्रा.ए.एम.महाजन यांनी वास्लो, पोलंड येथील विद्यापीठास भेट दिल्यानंतर दोन्ही विद्यापीठात सामंजस्य करार झाला होता व त्या आधारे वास्लो विद्यापीठ सहकार्य करत असलेल्या कन्सोर्टियम प्रकल्पामध्ये उमविला सहभागी केले होते. गेल्या एक वर्षापासून प्रा.महाजन व डॉ.जे.एस.सरदार हे सातत्याने कॅबसीन या कन्सोर्टियम प्रस्तावाबद्दल पाठपुरावा करत होते. या प्रकल्पाची निवड ब्रुसेल येथे इरास्मस फंडींगसाठी ७४५ पैकी गुणवत्तेच्या आधारे १२७ प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा शैक्षणिक संशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी या प्रकल्पाचा मोठा उपयोग होणार आहे.
काय होणार फायदा
या महत्वाच्या प्रकल्पात उत्तर महाराष्टÑ विद्यापीठासह भारतातील पाच विद्यापीठांचा समावेश आहे. सात कोटी रुपयांच्या निधीने साकारणाºया या प्रकल्पातंर्गत क्षमता विकसित केंद्र्र (कॅबसीन) स्थापन केले जाणार आहे. हे केंद्र अद्ययावत व आंतरराष्ट्रीय स्तरावरील राहणार असून यामध्ये आॅनलाईन अभ्यासक्रमांसाठी वेब प्लॅटफॉर्म विकसित होणार आहे. यासाठी विद्यापीठातील पाच शिक्षकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल. या केंद्राचा उपयोग प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी होणार असून विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचा देखील यात सहभाग असेल. याद्वारे व्हीडिओ लेक्चर, नोटस, प्रेझेंटेशन असाइनमेंट विद्यार्थ्यांना व अभ्यासकांना प्राध्यापकांमार्फत उपलब्ध करता येईल. या प्रकल्पांतर्गत प्राध्यापक व कर्मचाज्यांना प्रातिनिधिक स्वरुपात युरोपियन विद्यापीठात जाण्याची संधी प्राप्त होईल.