निकालाच्या बाबतीत ‘उत्तर महाराष्ट विद्यापीठ’ ठरले राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 01:22 PM2017-08-23T13:22:48+5:302017-08-23T13:27:15+5:30
उत्तर महाराष्ट विद्यापीठाकडून मार्च ते मे महिन्यात विविध विद्याशाखाच्या घेण्यात आलेल्या ७८३ परीक्षांपैकी ५८० परीक्षांचे निकाल ३० तर २०३ परीक्षांचे निकाल ४५ दिवसाच्या आत जाहीर करणारे उमवि हे राज्यातील अग्रेसर विद्यापीठ ठरले आहे. मुंबई विद्यापीठाचे निकाल अद्याप जाहीर झाले नसताना उमविने वेळेच्या आत निकाल जाहीर करून आपला स्वत:चा ‘उमवि पॅटर्र्न’ निर्माण केला आहे.
निकालाच्या बाबतीत ‘उत्तर महाराष्ट विद्यापीठ’ ठरले राज्यात अव्वल
आॅनलाईन लोकमत,
जळगाव, दि.२३,उत्तर महाराष्ट विद्यापीठाकडून मार्च ते मे महिन्यात विविध विद्याशाखाच्या घेण्यात आलेल्या ७८३ परीक्षांपैकी ५८० परीक्षांचे निकाल ३० तर २०३ परीक्षांचे निकाल ४५ दिवसाच्या आत जाहीर करणारे उमवि हे राज्यातील अग्रेसर विद्यापीठ ठरले आहे. मुंबई विद्यापीठाचे निकाल अद्याप जाहीर झाले नसताना उमविने वेळेच्या आत निकाल जाहीर करून आपला स्वत:चा ‘उमवि पॅटर्र्न’ निर्माण केला आहे.
विद्यापीठात विविध विद्याशाखेअंतर्गत मार्च ते मे महिन्यात घेण्यात आलेल्या ७८३ परीक्षांमध्ये १ लाख ५८ हजार विद्यार्थी बसले होते. १७ मार्च ते ६ जून या ८२ दिवसाच्या कालावधीत या सर्व परीक्षा पार पडल्या. यामध्ये एम.ए., एम.कॉम., विधी, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी व पदव्युत्तर या अभ्यासक्रमांच्या १ हजार ६६५ विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे वितरण उमविकडून आॅनलाईन पध्दतीने करण्यात आले. तर उर्वरीत अभ्यासक्र्रमांच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोहचविण्यात आल्या. यासाठी कुलगुरु प्र्रा.पी.पी.पाटील यांनी प्रारंभापासून परीक्षांचे निकाल वेळेवर लागावेत यासाठी प्रयत्न केले आहेत.
फास्टट्रॅक पध्दतीने ७०० हुन अधिक विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन
विद्यापीठाने वेळेवर निकाल लावण्यासोबतच यंदा प्रथमच निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी ‘फास्टट्रॅक’ पध्दतीने ७०० हुन अधिक विद्यार्थ्यांचे निकाल पुनर्मूल्यांकन केले आहेत. अनेकदा विद्यार्थी एखाद्या विषयात नापास झाल्यास विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकनासाठी तीन महिन्याहून अधिक वेळ जायचा यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल उत्तीर्ण लागल्यावर देखील विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात होते. मात्र विद्यापीठाने यंदा ‘फास्टट्रॅक’ पध्दतीने पुनर्मूल्यांकन करून विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा हिताचा निर्णय घेतला आहे.
उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी ११ केंद्रे
परीक्षांचे निकाल वेळेवर लागावेत यासाठी विद्यापीठाकडून परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.डी.एन.गुजराथी यांच्या सहकार्याने उत्तरपत्रिकांचे मूल्यांकनासाठी खान्देशात विविध ठिकाणी ११ केंद्रे निश्चित केली. यामध्ये धुळे जिल्ह्यात ६, नंदुरबार जिल्ह्यात व जळगावमध्ये ४ केंद्राचा समावेश आहे. विद्यापीठामध्ये होत असलेल्या या बदलांचे विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.