जळगावातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी प्रा. पी.पी. माहुलीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 01:29 PM2017-12-12T13:29:53+5:302017-12-12T13:32:22+5:30
14 डिसेंबर रोजी घेणार पदभार
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 12 - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी प्रा़पी़पी़माहुलीकर यांची नियुक्ती करण्यात आली आह़े माहुलीकर यांच्या नियुक्तीचे राज्यपाल सी़विद्यासागर राव यांचे पत्र विद्यापीठाला मंगळवारी सकाळी 10 वाजता प्राप्त झाले आह़े नवीन विद्यापीठ कायद्यानुसार प्र-कुलगुरु पदाची रचना करण्यात आली असून त्यानुसार प्रा़ माहुलीकर हे पहिलेच प्र-कुलगुरु ठरले आह़े 14 रोजी ते या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत़
कुलगुरु प्रा़ पी़पी़पाटील यांनी सप्टेंबर महिन्यात प्र-कुलगुरु पदासाठी चार नावे राज्यपालांकडे पाठविली होती़ त्यामध्ये प्रा़अमुलराव बोरसे आणि प्रा़ पी़पी़माहुलीकर यांची नावे आघाडीवर होती़ या दोन्हीपैकी प्र-कुलगुरुपदी राज्यपालांनी अखेर प्रा़माहुलीकर यांची नियुक्ती केली आह़े राज्यातील कोल्हापूर, पुणे व मुंबई या विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदाची निवड यापूर्वीच करण्यात आली आह़े मात्र उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्र-कुलगुरु पदासाठी प्रतीक्षा होती़ पहिल्याच प्र-कुलगुरुपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत शिक्षण क्षेत्रात उत्सुकता होती़ त्यावर अखेर मंगळवारी राज्यपालांकडून प्रा़ माहुलीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला़
‘लोकमत’चे भाकित ठरले खरे
उमविच्या प्र-कुलगुरु पदासाठी बोरसे व माहुलीकर यांची नावे चर्चेत या शिर्षकाखाली 28 नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले होत़े राज्यपालांकडून प्रा़माहुलीकर यांची प्र-कुलगुरुपदासाठी वर्णी लागल्याने लोकमतचे भाकित खरे ठरले आह़े