हिरवं स्वप्न नव्हे, शेतकऱ्यांसाठी मृगजळच ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 08:57 PM2020-09-08T20:57:40+5:302020-09-08T20:57:49+5:30
पºहाटीची नुसतीच वाढ : कापुस डोक्याएवढा, बोंडे हाता-पायाच्या बोटासम असल्याने उत्पन्नाबाबत सांशकता
खेडगाव, ता. भडगाव : यावर्षी चांगल्या व सातत्यपुर्ण पावसामुळे खरीप हंगामातील कापुस पिक दृष्ट लागण्याजोगे हिरवेगार दिसत असले तरी नुसतेच सहा-सात फुट डोक्याच्यावर वाढलेल्या कपाशीत सरासरीने फक्त पंधरा-विस बोंडे (कैºया) पहावयास मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. डोकाएवढा कापुसमा हातपायना बोटे इतलीच कैरी चमकस.. ! ही ओरड कापुस उत्पादक शेतक-यांमधुन होत आहे.
हिरवीगार शेते पण....
यावर्षी वेळच्या वेळी आलेल्या पावसाने सर्वत्र कपाशीची वाढ जोमदार झाली. आँगस्टपर्यंत मावा व तुडतुडे या किडीचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही. आँगस्टच्या दुसºया पंधरवड्यात काही भागात फुलकिड्यांचा (थ्रिप्स) कपाशीवर अटॅक झाला. यानंतर दहा-पंधरा दिवस चाललेल्या पावसाने कपाशीला लागलेली फुलफुगडी, पात्या पुर्णपणे झडत जमीनीवर पडली.
उत्पन्नाच्या दुष्टीने महत्वाचा असलेला पहीला-दुसरा फ्लँश जमीनीवर आला. बागायती, मान्सुनपुर्व कापसात निदान पंचवीस-तीस बोंडे पक्व दिसतात मात्र जुनच्या ७-८ तारखेनंतर लागवड केलेल्या कापसात सरासरी पंधरा-विस बोंडेच दिसतात. पºहाठीत मात्र माणुस दिसत नाही इतकी वाढ झालीय.काही क्षेत्रावर नुसताच कापुस दाटला आहे.कैऱ्यांची मात्र मारामार आहे. साधारणपणे कापुस ८०-९० दिवसाचा झाला म्हणजे ८० ते १०० बोंडे चांगल्या उत्पन्नासाठी व सरासरी पन्नास बोंडे तरी निदान खर्च व उत्पन्न यांच्या हातमीळवणीसाठी एका-एका झाडावर हवीत.