केवळ सौंदर्य नव्हे तर मन आणि विचारही सुंदर असायला हवे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 09:49 PM2019-10-12T21:49:03+5:302019-10-12T21:49:44+5:30

पत्रकार परिषद : मिस इंडिया मल्टीनॅशनल तन्वी मल्हाराने कथन केले सौंदर्य स्पर्धेविषयीचे अनुभव

 Not only beauty but also mind and thought must be beautiful! | केवळ सौंदर्य नव्हे तर मन आणि विचारही सुंदर असायला हवे !

केवळ सौंदर्य नव्हे तर मन आणि विचारही सुंदर असायला हवे !

googlenewsNext


जळगाव : सौंदर्य स्पर्धांमध्ये नुसते सुंदर असून चालत नाही तर आपल्यात गुणवत्तेसोबतच सुंदर मन व विचार असणे आवश्यक आहे़ त्या आधारावर आपण कोणतीही स्पर्धा जिंकू शकतो, असे मत ‘मिस इंडिया मल्टीनॅशनल-२०१९’ स्पर्धेच्या विजेत्या तन्वी मल्हारा यांनी शुक्रवारी निवासस्थानावर आयोजित पत्रकार परिषदेत मांडले़ याप्रसंगी तिचे वडील आनंद मल्हारा व आई डॉ़ नलिनी मल्हारा यांची उपस्थिती होती.
आपल्याला आलेल्या अनुभवाविषयी तन्वीने सांगितले की, बालपणापासूनच मला कॅमेऱ्याचं खूप आकर्षण़ बालपणीचं वाटायचे की, मिस युनिव्हर्स स्पर्धेत मी देशाचे प्रतिनिधीत्व करून तो सन्मान देशाला मिळवून द्यायचा़ आणि हे स्वप्न पूर्ण होण्यास सुरूवात झालेली आहे़ त्यासाठी आई-वडिलांकडून नेहमी पाठबळ मिळाले. कोणत्याही चांगल्या गोष्टीकडे सकारात्मकरित्या बघण्याचा दृष्टीकोन ठेवून काम करायला त्यांनी शिकविले़ आणि रेडिओमध्ये आऱजे़ म्हणून कामाला सुरूवात केली आणि त्यापासून माझ्या करिअरला सुरूवात झाली़ वडीलांनी सांगितले, तु संघर्ष केला पाहीजे. इथे थांबू नको पुढे जात रहा़ अखेर मी मुंबईत आली़ याच वर्षी मी मिस इंडियासाठी प्रयत्न केले, मिस अर्थसाठी प्रयत्न केले़ परंतु, अंतिम राऊंडपर्यंत जावून जिंकू शकले नाही़ पण, खचून न जाता मी नव्या उमीदीने कामाला लागले आणि तिसºया प्रयत्नात ‘मिस इंडिया मल्टीनॅशनल-२०१९’ स्पर्धेची विजेती ठरली़ मात्र, आपण सुंदर नाही याची कल्पना असतांना फक्त सौंदर्य महत्वाचे नसून आपल्यात बोलले, वागणे, हावभाव आणि प्रतिभा हे महत्वाचे आहे. याच जोरावर आपण ही स्पर्धा जिंकल्याची माहिती तन्वी मल्हारा यांनी दिली.
‘मिस इंडिया मल्टीनॅशनल-२०१९’चा किताब तन्वी मल्हारा हिने पटकाविल्यानंतर ती डिसेंबरमध्ये मिस मल्टीनॅशनल-२०१९ मध्ये भारताचे प्रतिनिधत्व करणार आहे़ या स्पर्धेत जगभरातील स्पर्धकांचा समावेश असणार आहे़ त्यामुळे आता खरं आव्हान सुरू झाले आहे.

लहानपणी मेकअप करून मी किती सुंदर आहे़, हे आई-वडिलांना दाखविण्याचा प्रयत्न करायची़ एक मात्र नक्की की लहानपणी शाळेत असल्यापासूनच तेच मला वकृत्वसाठी प्रवृत्त करायचे़ त्यामुळे माझ्यात प्रेक्षकांसमोर बोलायचे धाडस बालपणापासूनच आल्याचे तन्वीने आवर्जून सांगितले. बालपणापासूनच वत्कृत्वामध्ये धाडस दाखविणाºया तन्वी मिस मल्टीनॅशनल स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे सांगितले.

Web Title:  Not only beauty but also mind and thought must be beautiful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.