नुसत्या पदव्या घेणारी नाही, तर राष्टभक्तीने प्रेरीत पिढी घडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 07:48 PM2017-10-15T19:48:51+5:302017-10-15T19:50:39+5:30
भविष्यातील भारताला मजबूत व सक्षम करायचे असेल तर आजच्या विद्यार्थ्यांना आपल्या देशातील इतिहास ठासुन सांगण्याची गरज आहे. उद्याचा भारताला केवळ पदव्या घेणाºया पिढीची गरज नाही. तर राष्टभक्तीने प्रेरीत अशा पिढीची गरज आहे, आणि ती पिढी घडविण्याचे काम केवळ शिक्षकच करु शकतो, त्यामुळे शिक्षकांनी भविष्याचा भारताचा विचार करण्याची गरज असल्याचे मत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१५-भविष्यातील भारताला मजबूत व सक्षम करायचे असेल तर आजच्या विद्यार्थ्यांना आपल्या देशातील इतिहास ठासुन सांगण्याची गरज आहे. उद्याचा भारताला केवळ पदव्या घेणाºया पिढीची गरज नाही. तर राष्टभक्तीने प्रेरीत अशा पिढीची गरज आहे, आणि ती पिढी घडविण्याचे काम केवळ शिक्षकच करु शकतो, त्यामुळे शिक्षकांनी भविष्याचा भारताचा विचार करण्याची गरज असल्याचे मत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने रविवारी ला.ना.विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात जिल्ह्यातील १५ प्राथमिक शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री एकनाथराव खडसे, जि.प.अध्यक्षा उज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, खासदार ए.टी.पाटील, आमदार स्मिता वाघ, चंदुलाल पटेल, प्रा.चंदक्रांत सोनवणे, सुरेश भोळे, उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, माजी आमदार रामकृष्ण पाटील, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, शिक्षण सभापती पोपट भोळे यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी व जि.प.सदस्य उपस्थित होते.
जि.प.शिक्षकांनी आपल्या पाल्यांना जि.प.शाळेत टाकावे
गिरीश महाजन म्हणाले की, काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती बदलली आहे. ज्या शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याचा मार्गावर आल्या होत्या. त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. ही जि.प.शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ असून, जि.प.शिक्षकांनी देखील आपल्या पाल्यांना जि.प.शाळांमध्येच शिक्षण दिले पाहिजे, त्यामुळे समाजमनावर मोठा परिणाम होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच जि.प.पुरस्कारांमध्ये देखील आता बदल झाले असून आता खºया अथार्ने काम करणाºया शिक्षकांनाच हा पुरस्कार दिला जात असल्याचे ही गिरीश महाजन यांनी सांगितले.
शिक्षणाशिवाय दुसरे काम करणार अशी तक्रार करु नये-खडसे
एकनाथराव खडसे यांनी यावेळी बोलाताना सांगितले की, आज शिक्षकांवर नवीन व सुसंस्कृत पिढी घडविण्याची मोठी जबाबदारी आहे. शिक्षणाचे काम करत असताना, शिक्षकांकडून नेहमी शिक्षणाशिवाय दुसरे काम न करण्याचा तक्रारी केल्या जातात. मात्र या तक्रारी चुकीच्या असून, शिक्षकाने समाजकार्य व देशकार्यामध्ये देखील सहभागी होण्याची गरज आहे. शिक्षक हा समाजमन ओळखणारा घटक आहे. त्यामुळे शिक्षकांनी शिक्षणाशिवाय शासनाच्या इतर कामांकडे देखील गंभीरतेने लक्ष देण्याचे काम असल्याचे खडसे म्हणाले.
जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार दुध
जिल्ह्यात अजुनही कुपोषणाची समस्या कायम आहे. ती समस्या दुर करण्यासाठी जिल्हा दुध संघ व आनंद येथील डेअरीच्या माध्यमातुन जिल्ह्यातील सर्व जि.प.शाळा व महानगर पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना २०० ग्रॅम दुध वितरीत केले जाणार असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली. नोव्हेंबर महिन्यापासून ही योजना सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच डिजीटल शाळांकडे वळत असताना, शिक्षकांनी मर्यादित शिक्षणात न राहता विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान देखील द्यावे असे आवाहन देखील खडसे यांनी केले.
महाजन-खडसेंनी साधला एकमेकांशी संवाद
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे हे शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी एकाच व्यासपीठावर आले. ते काय बोलतात, याकडे शिक्षकांसह उपस्थित सर्वांचेच लक्ष होते. व्यासपीठावर ते शेजारी-शेजारी बसले. एकमेकांशी संवाद साधला. जवळच बसलेल्या खासदार ए.टी. पाटील यांच्यासोबतही ते हास्य विनोद करीत होते. मनोगत व्यक्त करताना या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करणे व चिमटे घेणे टाळले.
१५ शिक्षकांना सन्मान
जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील प्रत्येकी एक अशा प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुस्तक व दोन हजार रुपये रोख अशा या पुरस्काराचे स्वरुप होते. तसेच यावेळी राज्य शिक्षक पुरस्कारप्राप्त ला.ना.शाळेच्या शिक्षीका पल्लवी जोशाी यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. तर शंभर टक्के निकाल असलेल्या धरणगाव येथील बालकवी ठोंबरे विद्यालयाचा ढाल देवून सन्मान करण्यात आला. यावेळी राज्य शिक्षक पुरस्कारप्राप्त किशोर पाटील-कुंझरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात खासदार ए.टी.पाटील, अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय मस्कर व शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन अजबसिंग पाटील यांनी केले.