आता सातच्या नव्हे सकाळी अकराच्या आतच घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:16 AM2021-04-21T04:16:37+5:302021-04-21T04:16:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : किराणा दुकाने, भाजी विक्री यासह इतर सर्व खाद्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने आता फक्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : किराणा दुकाने, भाजी विक्री यासह इतर सर्व खाद्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने आता फक्त सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मंगळवारी दिले आहे.
राज्यात १४ एप्रिल ते १ मेपर्यंत संचारबंदी लागु करण्यात आली आहे. आतापर्यंत अत्यावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत खुली ठेवली जात होती. मात्र त्यामुळे संचारबंदीच्या नियमांचे फारसे पालन होत नव्हते. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, खाद्य पदार्थ विक्री दुकाने, कृषी संबधित उपकरणे व शेती उत्पादने, पशुखाद्य विक्री दुकाने इतर साहित्याची विक्री करणारी दुकाने ही फक्त सकाळी ७ ते दुपारी ११ पर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश १ मे पर्यंत लागु राहणार आहेत. तसेच या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत घरपोच डिलिव्हरी देता येणार आहे.
या आदेशाचे पालन होत आहे की नाही याची जबाबदारी संयुक्तरित्या पोलीस आणि संबधित स्थानिक स्वराज्य संस्थेवर देण्यात आली आहे.