निवडणूक प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या १३२ कर्मचाऱ्यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:27 PM2019-09-29T12:27:39+5:302019-09-29T12:28:03+5:30
जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षणास जळगाव शहर मतदार संघातील १२०० कर्मचाºयांपैकी १३२ कर्मचारी गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे ...
जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षणास जळगाव शहर मतदार संघातील १२०० कर्मचाºयांपैकी १३२ कर्मचारी गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जळगाव शहर मतदार संघातील १२०० कर्मचाºयांसाठी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या वेळी मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी दीपमाला चौरे यांनी प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षणासाठी विविध विभागाच्या कर्मचाºयांना पूर्व सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार १२०० पैकी केवळ एक हजार ६८ कर्मचारी हजर राहिले. मात्र पूर्व सूचना देऊनदेखील १३२ कर्मचारी या प्रशिक्षणास गैरहजर राहिले.
या निवडणूक कार्यक्रमात सर्वांवर सोपविलेली जबाबदारी पूर्ण करण्याच्या सूचना या पूर्वीच देण्यात आल्या असल्या तरी कर्मचारी गैरहजर राहिल्याने निवडणूक प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. त्यामुळे प्रशिक्षणाकडे पाठ फिरविली जात असल्याने संबंधित गैरहजर कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे दीपमाला चौरे यांनी सांगितले.