मनपा निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या २७० जणांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 08:57 PM2018-08-19T20:57:44+5:302018-08-19T20:59:49+5:30

मनपा निवडणुकीत उमेदवारांना दैनंदिन खर्च आॅनलाईन सादर करणे बंधनकारक होते. परंतू अद्यापही काही उमेदवारांनी हा खर्च सादर केलेला नसल्याचे निदर्शनास आल्याने, प्रशासनाने २७० जणांना नोटीस बजावल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Notice to 270 people who did not submit nomination for election expenses | मनपा निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या २७० जणांना नोटीस

मनपा निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या २७० जणांना नोटीस

Next
ठळक मुद्देदैनंदिन खर्च वोटर्स अ‍ॅप्सवर आॅनलाईन भरणे होते बंधनकारकअपक्ष उमेदवारांना निवडणुक खर्च सादर करण्याची ३० दिवसांची मुदतराजकीय पक्षांना ६० दिवसांची मुदत

जळगाव : मनपा निवडणुकीत उमेदवारांना दैनंदिन खर्च आॅनलाईन सादर करणे बंधनकारक होते. परंतू अद्यापही काही उमेदवारांनी हा खर्च सादर केलेला नसल्याचे निदर्शनास आल्याने, प्रशासनाने २७० जणांना नोटीस बजावल्याची माहिती सुत्रांनी दिली. तर वेळेत खर्च सादर न केल्यास अपात्रतेची कारवाईचींही सूचना नोटीसीतून बजावण्यात आली आहे.
महानगरपालिकेची निवडणुक नुकतीच पार पडली. राज्य निवडणुक आयोगाच्या निकषानुसार निवडणुक रिंगणातील प्रत्येक उमेदवारांना निवडणुकीचा दैनंदिन खर्च वोटर्स अ‍ॅप्सवर आॅनलाईन भरणे बंधनकारक आहे. काही उमेदवारांनी निवडणुक खर्च सादर केलेला आहे. तर काही उमेदवारांनी अद्यापही निवडणुक खर्च सादर केलेला नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अपक्ष उमेदवारांना निवडणुक खर्च सादर करण्याची ३० दिवसांची मुदत आहे. तर राजकीय पक्षांना ६० दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्यांचा निवडणुकीचा खर्च सादर करावा. अशा आशयाची नोटीस २७० उमेदवारांना बजावण्यात आली आहे.

Web Title: Notice to 270 people who did not submit nomination for election expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.