भडगाव तालुक्यातील 48 डॉक्टरांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2017 02:36 PM2017-05-09T14:36:41+5:302017-05-09T14:36:41+5:30
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातर्फे बोगस डॉक्टर शोध मोहीम
Next
भडगाव,दि.9- शहर व तालुक्यात बोगस डॉक्टर शोध मोहिमेचा धडक कार्यक्रम सुरु आहे. आतार्पयत तालुक्यातील 68 डॉक्टरांची तपासणी करीत 48 जणांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुचिता आकडे व भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.साहेबराव पाटील यांनी नोटिस बजावली आहे.
ग्रामीण भागात खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची भरारी पथकामार्फत नुकतीच तपासणी झाली. पथकात तहसीलदार सी.एम.वाघ, डॉ.सुचिता आकडे, सपोनि रवींद्र जाधव यांचा समावेश होता.
एका टप्प्यात एकूण 32 खासगी वैद्यकीय व्यवसायिकांची तपासणी करून 12 डॉक्टरांच्या त्रुटी आढळल्याने त्यांना नोटीस देण्यात आली. त्यांचा खुलासा मागितला आहे. आतापयर्ंत तालुक्यात फक्त 8 जणांचे खुलासे प्राप्त झाले आहेत. आपल्या पॅथीप्रमाणेच प्रॅक्टीस करण्यास वैद्यकीय व्यावसायिकांना सुचित केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुचित आकडे यांनी दिली.
याचबरोबर शहरातही बोगस डॉक्टर तपासणी व धडक मोहीम राबविण्यात आली. पथक प्रमुख ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.साहेबराव अहिरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सी.एम.वाघ, सपोनि रवींद्र जाधव यांच्या पथकाने 36 दवाखान्याची तपासणी केली. त्रुटी आढळलेल्या 36 जणांवर नोटिसा बजावण्यात आल्या. पूर्तता करुन खुलासा मागविण्यात आला आहे. त्रुटींची पूर्तता न करणा:या डॉक्टराचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांना पाठवणार आहे असे वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज जाधव यांनी सांगितले.