779 कर्मचा:यांना नोटीस

By Admin | Published: January 10, 2017 12:22 AM2017-01-10T00:22:16+5:302017-01-10T00:22:16+5:30

बीएचआर पतसंस्था : कागदपत्रे जमा करण्याचे दिले आदेश

Notice to: 779 employees | 779 कर्मचा:यांना नोटीस

779 कर्मचा:यांना नोटीस

googlenewsNext

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे सन 2014/15 व सन 2015/16 या आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षण कागदपत्रांअभावी रखडले आहेत. राज्यभरातील पतसंस्थांच्या शाखांमध्ये कामाला असलेल्या शाखाव्यवस्थापक, लिपीक व विभागीय व्यवस्थापकांनी आपल्याकडील कागदपत्रे लेखा परिक्षण पूर्ण करण्यासाठी उपलब्ध करून द्यावे या आशयाची नोटीस 779 कर्मचा:यांना काढली आहे. त्यानुसार औरंगाबाद विभागाच्या 62 कर्मचा:यांनी सोमवारी हजेरी लावत आपले म्हणणे मांडले.
भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेवर केंद्रीय निबंधक कृषी व सहकार विभाग यांच्या आदेशानुसार अवसायक म्हणून जितेंद्र कंडारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीएचआर पतसंस्थेतील काही कागदपत्रे उपलब्ध न झाल्यामुळे लेखापरिक्षण पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अवसायक यांनी या कागदपत्रांची जबाबदारी असलेल्या अधिकारी व कर्मचा:यांना नोटीस दिल्या आहेत.
बीएचआर पतसंस्थेतर्फे विभागनिहाय कर्मचा:यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यात औरंगाबाद विभाग 163, जळगाव विभाग 204, अहमदनगर विभाग 67, पुणे विभाग 120, धुळे विभाग 70 व नाशिक विभागातील 155 अशा 779 अधिकारी व कर्मचा:यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या कर्मचा:यांची विभागनिहाय बैठक आयोजित करण्यात आली आहे.
4शाखेच्या जागेसंबधी कराराची मुळ प्रत
4डेडस्टॉक, सोने तारण कर्जाबाबतचा तपशील व तारण सोने अवसायकांच्या ताब्यात का दिले नाही
4सन 2014 ते एप्रिल 15 या दरम्यान शाखेत कोणत्या कर्मचा:यांनी काम केले त्याची यादी
4संस्थेतील कजर्वाटप रजिष्टर, वाहन कर्ज वाटप, टर्म लोन वाटपाचा तपशिल
4बँकेचे स्टेटमेंट  तसेच शाखेच्या गुंतवणुकीबाबत खाते उतारे, तसेच संस्थेबाबत माहिती असलेली लेखी माहिती.
4हातातील शिल्लक रक्कम संस्थेच्या अवसायकांच्या ताब्यात का जमा केली नाही याचा खुलासा करावा व हिशेब देऊन तत्काळ रक्कम जमा करावी.
4शाखा जुळवणी बाबतचे जुळवणी पत्रक, मुख्य शाखेने पुरविलेल्या वाहनाबाबतची माहिती.
4सर्व व्यवहाराबाबतच्या नोंदी असलेल्या हार्डडिस्क, पेनड्राईव्ह.

Web Title: Notice to: 779 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.