मुक्ताईनगरात ८२ अतिक्रमणधारकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 09:16 PM2019-01-02T21:16:46+5:302019-01-02T21:17:14+5:30

औरंगाबाद, इंदूर महामार्ग चौपदरीकरण

Notice to 82 encroachment holders in Muktainagar | मुक्ताईनगरात ८२ अतिक्रमणधारकांना नोटीस

मुक्ताईनगरात ८२ अतिक्रमणधारकांना नोटीस

Next

मुक्ताईनगर : औरंगाबाद, इंदूर महामार्ग शहरातून जात आहे. या चौपदरीकरण रस्त्याच्या नियंत्रण रेषा हद्दीत येणाऱ्या शहरातील ८२ अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) नाशिक विभागांतर्गत हे कामसुरु असून या विभागाने ही नोटीस बजावली आहे.
जामनेर तालुक्यातील पहुर ते मध्य प्रदेशातील इच्छापूरपर्यत रस्त्याचे चौपदरीकरण व कॉक्रीटीकरण वेगाने सुरू आहे. हा रस्ता मुक्ताईनगर शहरातून जातो. बोदवड चौफुली चौक ते खामखेडा रस्त्यावरील स्मशानभूमीपर्यत तीन कि.मी. रस्त्याचे दुतर्फा व काही ठिकाणी डाव्या बाजूस अतिक्रमण करून दुकाने, टपरी, अनधिकृत बांधकाम केलेल्या सुमारे ८२ व्यावसायिकांना एमएसआरडीसीचे उपअभियंता नाशिक यांच्या कार्यालयातून २० डिसेंबर रोजी निर्गमित नोटीस अतिक्रमणधारकांना चार दिवस अगोदर बजाविण्यात आली आहे. लवकरच अतिक्रमण काढण्यात येणार आहे. सध्या बोदवड चौफुलीपासून मुक्ताईनगर शहरातून रस्त्याच्या दोन्ही बाजुने आरसीसी गटारीचे काम सुरू आहे.
भारत सरकारच्या रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने राजपत्रात जामनेर तालुक्यातील पहूर जामनेर बोदवड मुक्ताईनगरमार्गे मध्य प्रदेशातील इच्छापूर हा रस्ता राष्टÑीय राजमार्ग क्रमांक ७५३ एल म्हणून घोषित केलेला आहे.एमएसआरडीसी शिबिर कार्यालय नाशिक यांच्या अंतर्गत या रस्ताचे चौपदरीकरण व कॉक्रीटीकरणाचे काम करण्यात येत आहे. पहूर ते नाडगाव ४५ किलोमीटर आणि नाडगाव ते इच्छापूर ३३ किलोमीटर असे दोन टप्प्यात काम होत आहे. या प्रकल्पावर १२८ कोटी रुपये खर्च आहे.
शहरालगत प्रवेश असलेल्या बोदवड चौफुली चौक ते मुक्ताईनगर शहरातून जाणाºया खामखेडा रस्त्यावरील स्मशानभूमीपर्यतच्या ३ कि.मी. रस्त्याच्ता दोन्ही बाजुला असलेले नियमबाह्य अतिक्रमण, बांधकाम हे राष्ट्रीय महामार्गाच्या नियमानुसार नियमांचे उल्लघंन केलेले दिसून येत असलेले बांधकाम काढण्यात येणार आहे. यात होणाºया नुकसानीस दुकानदार स्वत: जबाबदार असणार असल्याचे नोटीसीत म्हटलेले आहे . यामुळे बोदवड चौफुली ते थेट बºहाणपूर रोड स्मशानभूमीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा व काही ठिकाणी डावे बाजूस राष्ट्रीय महामार्ग नियमानुसार इमारत रेषा व नियंत्रण रेषा यामध्ये येणारे अतिक्रमण काढले जाणार आहे.

Web Title: Notice to 82 encroachment holders in Muktainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.