निवडणूक प्रशिक्षणाला दांडी ९२९ कर्मचाऱ्यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 01:14 PM2019-04-02T13:14:47+5:302019-04-02T13:15:22+5:30
दोन दिवसात मागितला खुलासा
जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांसाठी जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, जामनेर, एरंडोल व फैजपूर, उपविभागात झालेल्या प्रशिक्षणास ९२९ कर्मचाºयांनी दांडी मारल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन दिवसात समाधानकारक खुलास न आल्यास या कर्मचाºयांना निलंबनाची कारवाई किंवा गुन्हाही दाखल होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० हजार ३७० कर्मचारी लागणार आहेत. यासाठी जवळपास ३४ हजार कर्मचाºयांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. या कर्मचाºयांचा मतदान प्रक्रियेविषयी प्रशिक्षण वर्ग रविवार व सोमवार असे दोन दिवस झाला.
६० कर्मचाºयांना नोटीस
जळगाव ग्रामीण मतदार संघासाठी १४२५ कर्मचाºयांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या कर्मचाºयांचा दोन दिवस प्रशिक्षण वर्ग भूसंपादन उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी घेतला. या प्रशिक्षणास ६० कर्मचाºयांनी कोणतेही कारण न कळविता दांडी मारली. या कर्मचाºयांना १३४ प्रमाणे नोटीस बजावण्यात येत असल्याचे राजेंद्र वाघ यांनी सांगितले.
फैजपूर विभागात १२४ जणांना नोटीस
रावेर लोकसभा मतदार संघांतर्गत फैजपूर येथे २२९८ कर्मचारी व अधिकाºयांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन प्रांत डॉ. अजित थोरबोले यांनी प्रशिक्षण वर्ग घेतला. या वर्गास १२४ कर्मचारी कोणतेही कारण न कळविता गैरहजर होते. त्यांना नोटीस बजावण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एरंडोल येथे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी उपस्थिती दिली. ५३ कर्मचाºयांनी प्रशिक्षणाला दांडी मारली. त्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले.
जामनेरला १०३ जणांना नोटीस
जामनेर येथे झालेल्या अधिकारी व कर्मचाºयांच्या प्रशिक्षणात १०३ जण गैरहजर होते. त्यांच्याकडुन खुलासा मागविण्यात येणार आहे. खुलासा न पाठविणाºयांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी दिली.
रविवार व सोमवार असे दोन दिवस न्यु इंग्लिश स्कुल व शालिमार चित्रपट गृहात प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व रावेर मतदार संघाचे निवडणूक अधिकारी गोरक्ष गाडीलकर, सहाय्यक अधिकारी प्रसाद मते यांनी मार्गदर्शन केले. निवडणुक कामासाठी तालुक्यात १४४५ पुरुष व २२८ महिला कर्मचायाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव शहर मतदार संघात ४१५ कर्मचाºयांची दांडी
जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी प्रांत दिपमाला चौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण वर्ग झाला. छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात हे प्रशिक्षण झाले. यात २४४० पुरूष व १०२३ महिला कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणास ३०८ पुरूष व १०७ महिला कर्मचाºयांनी दांडी मारल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली असल्याचे दिपमाला चौरे यांनी सांगितले.