गैरहजर वैद्यकीय अधिका:यांना नोटिस

By admin | Published: February 17, 2017 01:09 AM2017-02-17T01:09:24+5:302017-02-17T01:09:24+5:30

कारवाई: अतिरिक्त आरोग्याधिका:यांची शिरुड, मुकटी आरोग्य केंद्रांना अचानक भेट

Notice to the absent medical officer | गैरहजर वैद्यकीय अधिका:यांना नोटिस

गैरहजर वैद्यकीय अधिका:यांना नोटिस

Next

धुळे : तालुक्यातील शिरुड आणि मुकटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़बाळासाहेब चव्हाण यांनी 9 फेब्रुवारी रोजी अचानक भेट दिल्यामुळे यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली़ शिरुडच्या वैद्यकीय अधिका:यांना त्यांनी गैरहजेरीमुळे कारणे दाखवा नोटीस दिली आह़े
पीएचसीत आलबेल
जिल्ह्यात सद्य:स्थितीत 41 प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित आहेत़ त्यापैकी बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रांतील स्थिती लक्षात घेता आलबेल असल्याचे समोर येत आह़े
आरोग्याबाबत चर्चा
आरोग्य समितीची बैठक दर महिन्याला होत असत़े या बैठकीत आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा आणि प्रशासनाकडून दखल घेण्याची अपेक्षा सदस्यांकडून वेळोवेळी व्यक्त असत़े मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याची वस्तुस्थिती आह़े दखल घेतली गेली असती तर आरोग्याच्या कोणत्याही समस्या आणि उदासीनता समोर आली नसती़ 
सभेतही उमटतात पडसाद
आरोग्य समितीच्या बैठकीत चर्चा होत़े त्याचे पडसादसुद्धा यापूर्वी स्थायी समितीसह सर्वसाधारण सभेत उमटले आहेत़ त्याची दखल तातडीने घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आह़े पण त्याचे गांभीर्य जिल्हा परिषद प्रशासनाला नसल्याने याबाबत केवळ चालढकल केली जात असल्याचे स्पष्ट आह़े आरोग्याबाबत नेहमीच काथ्याकूट होत असतो़
उपचारावर होतोय परिणाम
ग्रामीण जनतेच्या आरोग्याची काळजी ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून घेतली जाते, त्याच केंद्रांची दुरवस्था आणि कामकाजाकडे होत असलेले दुर्लक्ष प्रकर्षाने जाणवत आह़े त्याचा विपरीत परिणाम हा उपचार पद्धतीवर स्वाभाविकच होतो़ उपचार घेण्यासाठी ग्रामस्थ येतात, पण जागेवरच वैद्यकीय अधिकारी नसल्याने प्रभावी उपचार होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होऊ लागली आह़े वेळेवर प्राथमिक उपचार न मिळाल्यास आणि काही विपरीत घटना घडल्यास याची जबाबदारी कोणावर? असा प्रश्न आता पुढे आलेला आह़े
अचानक भेटीचा पवित्रा
जिल्ह्यातील बहुसंख्य आणि मोठय़ा गावांशी निगडित असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी मनमानी पद्धतीने वागत आहेत. त्यांच्यावर कोणाचाही वचक राहिला नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत होती़ ग्रामस्थांची नाराजी आणि सभापतींच्या सूचनांकडे वारंवार होत असलेल्या दुर्लक्षामुळे ही बाब जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गांभीर्याने घेतली आह़े त्यामुळे अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ़ बाळासाहेब चव्हाण यांनी मुकटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली़ त्या वेळी औषधांची मांडणी नियमाप्रमाणे नव्हती़ अस्ताव्यस्तपणा होता़
आरोग्य समितीच्या सभापती नूतन निकुंभ यांच्याकडून वेळोवेळी आरोग्यसेवेचा आढावा होत असतो़ तरीदेखील याबाबीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे स्पष्ट आह़े
शिरुडचे द्वितीय वैद्यकीय अधिकारी डॉ़ कुलदीप गजरे वरिष्ठांची लेखी परवानगी न घेता गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आह़े तर मुकटीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात व्यवस्थितपणा करण्याच्या सूचना देत आठ दिवसांची मुदत देण्यात आली आह़े
सततच्या होत असलेल्या तक्रारी, अधिकारिवर्गाची अनुपस्थिती लक्षात घेता अचानक भेट देण्यात आली आह़े भेटीचा अहवाल प्रशासनाला दिला आह़े यापुढेही अचानक भेट दिली जाईल़
-डॉ़बाळासाहेब चव्हाण,
अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी

Web Title: Notice to the absent medical officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.