पतीच्या गैरवर्तणूकप्रकरणी नगरसेविकेला नोटीस

By Admin | Published: May 19, 2017 05:36 PM2017-05-19T17:36:57+5:302017-05-19T17:36:57+5:30

नगरसेविका पदाधिका:यांऐवजी त्यांचे पतीच सहभागी होतात अशी परिस्थिती निर्माण

Notice to corporator for abusive abuse of husband | पतीच्या गैरवर्तणूकप्रकरणी नगरसेविकेला नोटीस

पतीच्या गैरवर्तणूकप्रकरणी नगरसेविकेला नोटीस

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

वरणगाव, जि. जळगाव, दि. 19 - : नगरपालिका कारभारात नगरसेविका पदाधिका:यांऐवजी त्यांचे पतीच सहभागी होतात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेविका जागृती सुनील बढे यांना त्यांचे पती सुनील बढे यांच्या   गैरवर्तनुकीप्रकरणी नोटीस बजावली आहे. तसेच  जिल्हाधिका:यांकडे कारवाईसाठी प्रस्ताव का पाढवू नये  ? याबाबत तीन दिवसात खुलासा मागितला आहे.
 सहा महिन्यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांची मुदत संपत आहे. या पदावर वर्णी लागावी या हेतून पक्षातील एक सक्रीय असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या या पवित्र्याने  इतर महिला सदस्यांच्या पतींनी सावध भूमिका घेतली आहे. ते  दोन दिवसापासून नगरपालिकेत फिरकलेच नाही.
2 मे रोजी  सर्वसाधारण सभेतून नगरसेविकेने सभात्याग केला. त्या बाहेर पडल्या त्यावेळी नगरसेविकेचे पती सुनील बढे यांनी नगरपालिका कार्यालयाविषयी शिवराळ भाषा वापरली. शिवाय 9 मे रोजी प्रभाग क्रमांक एकमधील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याप्रकरणी नगरपाकिलेवर मोर्चा आणला होता. त्यावेळी पाणीपुरवठय़ाबाबत आलेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समजावूनही सुनील बढे यांनी पदाधिकारी व मुख्याधिकारी यांना  शिवराळ  भाषा   वापरून   नगरपालिकेच्या प्रशासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पाणीपुरवठा विभागातील  कर्मचा:यांना अरेरावीची भाषा वापरुन त्यांच्याशी वाद घातला, शिवीगाळ करून प्रशासकीय कामकाजासंदर्भात गैरवर्तन केले   असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. तीन दिवसात आपले म्हणणे मांडण्याचा नोटीसमध्ये उल्लेख आहे.
माङया पतीवर गैरवर्तणुकीचे लावलेले आरोप खोटे आहेत. पाण्यासाठी आंदोलनात ते सहभागी होते. मात्र त्यांनी  कोणाबाबतही शिवराळ भाषेचा वापर केला नाही. याबाबत पक्ष श्रेष्ठींशी चर्चा झाली आहे, असे नगरसेविका  जागृती   बढे यांनी सांगितले.

Web Title: Notice to corporator for abusive abuse of husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.