आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर कारवाईच्या मागणीची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:13 AM2021-07-16T04:13:44+5:302021-07-16T04:13:44+5:30
जामनेर : वीज अभियंत्याला दिलेल्या वर्तनाच्या पार्श्वभूमीवर चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या समर्थकांवर कार्यवाही करावी, असे मंत्रालयातील संसदीय ...
जामनेर : वीज अभियंत्याला दिलेल्या वर्तनाच्या पार्श्वभूमीवर चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या समर्थकांवर कार्यवाही करावी, असे मंत्रालयातील संसदीय कार्य विभागाने कळविले आहे.
आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या समर्थकांनी जळगाव येथे वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना कार्यालयात खुर्चीला दोराने बांधून ठेवले होते. या प्रकरणी चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी येथील कॉंग्रेस कार्यकर्ते अशपाक पटेल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
मंत्रालयातील संसदीय कार्य विभागातील कक्ष अधिकारी यांनी अवर सचिव गृह विभाग व विधानमंडळ सचिवालयातील अवर सचिवांना जिल्हाधिकारी यांचे पत्र व अशपाक पटेल यांचे निवेदन पाठवून कार्यवाही करण्याचे कळविले असल्याची माहिती पटेल यांनी दिली.
काही लोकप्रतिनिधी गुन्हेगारी संस्कृती निर्माण करण्यालाच राजकारण समजतात. विधिमंडळाने केलेल्या कायद्यांचा अपमान करण्याचा अधिकार लोकप्रतिनिंधींना नाही. अधिकाऱ्याला त्याने आपले कर्तव्य का बजावले म्हणून दमदाटी करून त्याला अपमानाची वागणूक देणे, मारहाण करणे हे विधी मंडळाच्या अधिकारांचे उल्लंघन असून हक्कभंग आहे.
- अशपाक पटेल, जामनेर