उपसंपादकासाठी सूचना - स्टॉफ की स्टाॅक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:14 AM2021-07-17T04:14:33+5:302021-07-17T04:14:33+5:30

केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात एक दिवसीय बंद लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र शासनाच्या कडधान्य आकस्मित स्टॉफ लिमिट लावण्याच्या धोरणाविरोधात ...

Notice for Deputy Editor - Staff or Stack? | उपसंपादकासाठी सूचना - स्टॉफ की स्टाॅक?

उपसंपादकासाठी सूचना - स्टॉफ की स्टाॅक?

Next

केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात एक दिवसीय बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : केंद्र शासनाच्या कडधान्य आकस्मित स्टॉफ लिमिट लावण्याच्या धोरणाविरोधात शुक्रवारी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी बांधवांनी एक दिवसाचा बंद पुकारला होता. यामुळे बाजार समितीमधील सुमारे ५० लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांनी दिली. धान्य बाजारातील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या एका दिवसाच्या संपामुळे भाजीपाला मार्केटमधील उलाढालीवरदेखील परिणाम झाला असून, शुक्रवारी बाहेरगावाहून येणाऱ्या शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती.

केंद्र शासनाने कडधान्यावर आकस्मित स्टॉफ लिमिट लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे धान्य व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयाविरोधात बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी एकदिवसीय बंदची घोषणा केली होती. शुक्रवारी धान्य मार्केटमधील एकही दुकान उघडले नाही. अनेक शेतकरी आपला माल घेऊन बाजार समितीत आले होते. मात्र, धान्य बाजार बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणलेला माल परत घेऊन जावा लागला. दरम्यान, सद्य:स्थितीत पावसाळा असल्याने उलाढालीवर फारसा परिणाम झाला नसल्याची माहिती सभापतींनी दिली आहे.

शासकीय खरेदी केंद्र सुरू करा

राज्य शासनाकडून उद्दिष्ट संपल्याचे कारण देत शासकीय खरेदी केंद्र बंद केले आहे. त्यामुळे नोंदणी केल्यावरदेखील अनेक शेतकऱ्यांचा माल या ठिकाणी खरेदी करण्यात आलेला नाही. मका व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना नाइलाजस्तव कमी भावात आपला माल व्यापाऱ्यांना विक्री करण्याची वेळ आली असून, शासनाने लवकरात लवकर उद्दिष्ट वाढवून शासकीय खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

Web Title: Notice for Deputy Editor - Staff or Stack?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.