मांडवेदिगरवासीयांना दोन हजार एकर जमीन खाली करण्याच्या मिळाल्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 09:01 PM2019-08-04T21:01:24+5:302019-08-04T21:04:20+5:30
भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर या बंजारा वस्तीतील तब्बल दोन हजार एकर जमीन शासन जमा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी चांगलाच धसका घेतला आहे. या धसक्यामुळे रविवारी एक महिला व एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
उत्तम काळे
भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील मांडवेदिगर या बंजारा वस्तीतील तब्बल दोन हजार एकर जमीन शासन जमा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी चांगलाच धसका घेतला आहे. या धसक्यामुळे रविवारी एक महिला व एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत प्रशासकीय अधिकारी मात्र अद्यापही अनभिज्ञ आहे.
मांडवेदिगर, भिलमळी व मुसाळतांडा अशी बंजारा व भिल्ल समाजाची तीन गावांची एक किलोमीटर अंतरात वस्ती आहे. तिन्ही तांड्यांची लोकसंख्या जवळपास पाच हजारावर पोहोचली आहे. गेल्या दीडशे वर्षांपूर्वीची ही वस्ती असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दीडशे वर्षांपासून हा समाज या परिसरातील शेतीवर अवलंबून आहे. बहुतांशी जमीन ही शेतकऱ्यांनी विकत घेतली. त्याचा खरेदी-विक्रीचा टॅक्स व शेतसाराही ग्रामस्थ दीडशे वर्षांपासून भरत आहे. त्यांच्याकडे खरेदी खत आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशाने शासनाने गेल्या काही दिवसांपासून ही जमीन शासन जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी ग्रामस्थांना नुकतीच जमीन व गावातील घरे खाली करण्यासंदर्भात नोटिसा दिल्या आहे.
पालकमंत्र्यांकडूनही ग्रामस्थ आले आहे खाली हात
ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे यांच्याकडेही न्यायासाठी प्रयत्न केले. मात्र हा प्रश्न न्यायालयीन व न्यायप्रविष्ट असल्यामुळे ग्रामस्थांना येथूनही खाली हात यावे लागले, असे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे आता न्याय कुणाकडे मागावाल असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उपस्थित झाला आहे?
दरम्यान, ३ रोजी सुमारे शंभर लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी जळगाव येथे धाव घेतली होती. मात्र जिल्हाधिकाºयांची भेट झाली नसल्यामुळे ग्रामस्थ परत आले आहे. त्यात दुसºयाच दिवशी धसक्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
प्रांताधिकाºयांनी सांगितले अपील दाखल करा
प्रांताधिकारी चिंचकर यांनी या जमिनी शासन जमा करण्याची प्रक्रिया केल्यानंतर जिल्हाधिकाºयांकडे अपील करा, अशी सूचना केली आहे. अपील करण्यास गावकºयांना तब्बल १५ ते २० लाख रुपये खर्च येणार आहे. अगोदरच गोरगरीब व भटका-विमुक्त समाज एवढा खर्च करणार कुठून, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यात शासनाने ही कारवाई केल्यामुळे ग्रामस्थांनी जावे कुठे व राहावे कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे .
दोघांच्या मृत्यूनंतर गाव झाले भयभीत
शासन तब्बल दोन हजार एकर जमीन ताब्यात घेणार असल्यामुळे तिन्ही गावे संपूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. याचा धसका घेऊन रविवारी सोदरीबाई मोरसिंग पवार (वय ५५) यांचा पहाटे चार वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर ग्रामस्थ गावात येत नाही, तोपर्यंत अजमल सदू पवार (वय ३०) यांचाही मृत्यू झाला. पवार यांचा मुलगा त्यांना घर खाली करण्यासंदर्भात आलेली नोटीस वाचून दाखवत असताना पवार खाली कोसळले व त्याचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अजमल पवार यांच्या पश्चात वयोवृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
जमीन खाली करण्यासंदर्भात हायकोटार्चा निकाल -प्रांताधिकारी चिंचकर
मांडवेदिगर येथील जमीन ही देवस्थानाची आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात एक याचिका दाखल होती. यावेळी कोर्टाने ही जमीन खाली करण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाप्रमाणे ही जमीन खाली करण्यासंदर्भात मी नोटीस दिली आहे. त्याचप्रमाणे मी संबंधितांना जिल्हाधिकाºयांकडे अपील दाखल करण्याचेही त्यांनी सुचवले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिली.