किनगावजवळील अपघातप्रकरणी चौकशीच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:18 AM2021-02-16T04:18:06+5:302021-02-16T04:18:06+5:30
जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव येथे झालेल्या ट्रक अपघातप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन विभाग व सा.बां. विभागाला चौकशीच्या सूचना दिल्या असल्याची ...
जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव येथे झालेल्या ट्रक अपघातप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन विभाग व सा.बां. विभागाला चौकशीच्या सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. याचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल व यात रस्ते सुरक्षेच्यादृष्टीनेही माहिती घेणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर रविवारी मध्यरात्री ट्रक अपघात होऊन १५ जण ठार झाल्याची घटना घडली. या अपघातात वाहनाचा स्टेअरिंग रॉड तुटल्याची प्राथमिक माहिती आली असून शिवाय हा ट्रक ओव्हर लोड होता, असेही समजले असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले. तरीदेखील अपघाताची सखोल माहिती समोर येण्याच्या दृष्टीने उपप्रादेशिक परिवहन विभाग व सा.बां. विभागाला चौकशीच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
——————-
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील अपघाताविषयी संबंधित वाहनाचा स्टेअरिंग रॉड तुटल्याची व हा ट्रक ओव्हर लोड होता, अशी प्राथमिक माहिती समजली आहे. या विषयी उपप्रादेशिक परिवहन विभाग व सा.बां. विभागाला चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने माहिती घेतली जाणार असून यात कोणी दोषी असल्यास कारवाई करण्यात येईल.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी.