जळगावात नगरसेवकाला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:36 PM2017-07-22T12:36:18+5:302017-07-22T12:36:18+5:30
या जागेत बाजार भरविण्यास परवानगी दिली जाऊ नये अशी मागणी होती.
Next
ऑ लाईन लोकमतजळगाव, दि. 22 - बळीराम पेठेत खाजगी जागेवर भाजी विक्रेत्यांना बाजार भरविण्यास जागा देऊ नये म्हणून जागा मालक नगरसेवक कैलास सोनवणे यांना नोटीस बजावण्यात आली असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले. हॉकर्सची तयारी पण..बळीराम पेठ भागातील भाजी विक्रेते ख्वॉजामियाँ झोपडपट्टीच्या जागेत भाजी विक्रीस बसण्यास तयार आहेत. मात्र बळीराम पेठेत नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या मोकळ्या प्लॉटवर 50 ते 75 भाजी विक्रेते बसतात. या खाजगी जागेत बाजार भरत असल्याने नव्या जागेत आम्ही गेल्यावर व्यवसाय होणार नाही, अशी भीती बळीराम पेठेतील भाजी विक्रेत्यांना आहे. त्यामुळे या जागेत बाजार भरविण्यास परवानगी दिली जाऊ नये अशी मागणी होती.बळीराम पेठेत खाजगी जागेत परवानगी न घेता बाजार भरविल्याप्रकरणी कैलास सोनवणे यांना मनपा अधिनियम कलम 378 व 379 नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांनाही पत्र देण्यात आले असून हा परिसर हॉकर्स मुक्त करावा असे कळविण्यात आल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले. दोन दिवसात हॉकर्सचे स्थलांतर केले जाणार आहे. मध्यरात्री जिल्हाधिका:यांनी दिली भेट गुरुवारी रात्री 10.15 वाजेर्पयत प्रभारी आयुक्त निंबाळकर हे मनपात बसून होते. रात्री 10.30वाजता त्यांनी प्रथम गोलाणी मार्केटला भेट दिली. त्यानंतर बळीराम पेठ, सुभाष चौक भागात ते गेले. तेथून दाणा बाजार, फुले मार्केट परिसराचीही त्यांनी पाहणी केली. फुले मार्केटमधील दोन पेटय़ाही जप्त करण्यात आल्या. रात्री 12 वाजेर्पयत ते मनपातील अधिका:यांसमवेत फिरत होते.