जळगाव - पाचोरा रस्त्याच्या कामासाठी भुसंपादनाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:13 AM2021-01-09T04:13:35+5:302021-01-09T04:13:35+5:30
जळगाव : जळगाव ते पाचोरा या रस्त्यासाठी तालुक्यातील गावांमध्ये भुसंपादनाच्या नोटीस देण्यात आल्यात आहेत. राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक ७५३ जे ...
जळगाव : जळगाव ते पाचोरा या रस्त्यासाठी तालुक्यातील गावांमध्ये भुसंपादनाच्या नोटीस देण्यात आल्यात आहेत. राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक ७५३ जे साठी ० ते २५.५ किमी भुखंडाची निर्मिती आणि देखभाल व्यवस्थापन व वापर मार्गाच्या निर्मीतीसाठी भु संपादनाचा प्रस्ताव आहे. जेथे जमीन आवश्यक आहे. त्यासाठी जमीन संपादनाची घोषणा करण्यात आली आहे.
यात तालुक्यातील बिलखेडे, बिलवाडी, मोहाडी, पाथरी, शिरसोली प्र.न. वडली, शिरसोली प्र.बो., वावडदे या गावातील जमिनींचा त्यात समावेश आहे. त्यासाठी हरकत घेण्याची मुदत २१ दिवसांची आहे. तर रामदेव वाडीतील जागेचाही प्रस्ताव आहे. रामदेव वाडी आणि वावडदे येथील भुसंपादनाच्या प्रस्तावावर हरकतींवर २१ रोजी सुनावणी आहे.
औरंगबाद रस्त्यासाठी देखील भुसंपादनाचे प्रस्ताव
औरंगाबाद रस्त्यासाठी मेहरुण, चिंचोली, कुसुंबे खुर्द, उमाळे, गाडेगाव प्र.न. माळपिंप्री, नेरी बुद्रुक, नेरी दिगर, पाळधी, वाकोद या गावांमधील काही जमिनींच्या भुसंपादनाचे प्रस्ताव आहेत.
जळगाव विभागात १२५ भुसंपादनाचे प्रस्ताव
जळगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कक्षेत येणाऱ्या गावांमध्ये १२५ भुसंपादनाचे प्रस्ताव आहेत. जिल्ह्यात रेल्वे आणि महामार्गाचे विविध प्रस्ताव आहेत. रेल्वेची तिसरी लाईन, चौथी लाईन यासाठी जमिन संपादनाचे प्रस्ताव आहेत.