कुलगुरूंची बदनामी केली म्हणून एनएसयुआय जिल्हाध्यक्षांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 09:01 PM2020-12-22T21:01:39+5:302020-12-22T21:01:48+5:30

विद्यापीठ : अन्यथा दिवाणी व फौजदारी कारवाई..

Notice to NSUI District President for defaming the Vice-Chancellor | कुलगुरूंची बदनामी केली म्हणून एनएसयुआय जिल्हाध्यक्षांना नोटीस

कुलगुरूंची बदनामी केली म्हणून एनएसयुआय जिल्हाध्यक्षांना नोटीस

Next

जळगाव : भुसावळ येथील पी.के. कोटेचा महाविद्यालयाच्या प्राचार्यांची मुदत संपल्यावरही विद्यापीठाने त्यांची नियुक्ती कायम ठेऊन लाखो रुपयांची आर्थिक देवाण-घेवाण केल्याचा आरोप करणाऱ्या एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना कुलगुरुंची बदनामी केली म्हणून १ कोटी रूपयांची नुकसान भरपाई अदा करावी अशी नोटीस विद्यापीठाच्यावतीने पाठविण्यात आली आहे.

एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी लाखो रुपये घेऊन विद्यापीठाने मुदत संपल्यावरही डॉ.मंगला साबद्रा यांना प्राचार्य पदावरची नियुक्ती तशीच ठेवली आहे. अशा आशयाचे पत्रक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्धसाठी दिले होते. त्यामध्ये या प्रकरणात कुलगुरुंशी आर्थिक देवाण-घेवाण झाली असल्याचा आरोपही केला होता. समाज माध्यमांमध्येही तशी क्लिप त्यांनी प्रसारीत केली होती. या बातमी मुळे विद्यापीठाची बदनामी केली म्हणून विद्यापीठाच्यावतीने प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांच्या स्वाक्षरीने देवेंद्र मराठे यांना ॲड. सुशील अत्रे व ॲड.निशांत अत्रे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे. विद्यापीठाची बदनामी केली म्हणून मराठे यांनी लेखी व बिनर्शत माफी मागावी, तसेच १ कोटी रूपयांची नुकसान भरपाई अदा करावी अन्यथा त्यांच्या विरुध्द दिवाणी व फौजदारी कारवाई केली जाईल असेही या नोटीस मध्ये म्हटले आहे.

Web Title: Notice to NSUI District President for defaming the Vice-Chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.