भडगावला १८८ पडकी घरे, इमारत मालकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:12 AM2021-06-21T04:12:21+5:302021-06-21T04:12:21+5:30
शहरातील धोकादायक घरांसह पडक्या जीर्ण इमारतींचे मान्सूनपूर्व सर्वेक्षण नगर परिषद प्रशासनाने यापूर्वीच केले होते. पावसाळ्यात शहरातील ही ...
शहरातील धोकादायक घरांसह पडक्या जीर्ण इमारतींचे मान्सूनपूर्व सर्वेक्षण नगर परिषद प्रशासनाने यापूर्वीच केले होते. पावसाळ्यात शहरातील ही पडकी घरे व जीर्ण इमारती पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. यापूर्वी शहरात काही दुर्घटनाही घडल्या आहेत. त्यांच्यापासून जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालिकेने सावधानता बाळगून या नोटिसा जारी केल्या आहेत.
भडगाव शहरातील पडकी घरे पाडण्यासाठी व जीर्ण इमारती पाडण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने जवळपास एकूण १८८ मालमत्ताधारक मालकांना नोटिसा बजावल्या आहेत.
इमारतीचा पडण्यास आलेला भाग काढून घेण्याचे काम ‘एक्स्पर्ट सुपरवायझर’च्या देखरेखीत आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनेसह करणे आवश्यक आहे. इमारत पाडताना धोक्याच्या इशाऱ्याचे फलक रहदारी रस्त्यावर, इमारत परिसरात लावणे आवश्यक आहे. तसेच इतर कायदेशीर बाबींची जबाबदारी घरमालकांची राहील. दिलेल्या मुदतीत जीर्ण घर, इमारत न पाडल्यास नगरपालिका, नगरपंचायतीचे १६६५ कलम १९५ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.
कोट करणे
भडगाव शहरातील धोकादायक पडकी घरे, जीर्ण इमारतींचे मान्सूनपूर्व सर्वेक्षण यापूर्वीच करण्यात आले आहे. पावसाळा सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील पडकी घरे, जीर्ण इमारती मालमत्ताधारक, घरमालक असे एकूण १८८ जणांना नोटिसा बजावल्या आहेत. दिलेल्या मुदतीत पडाऊ घर, जीर्ण इमारती, कोसळणारा भाग काढून टाकावा, अन्यथा घरमालकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
-विकास नवाळे, मुख्याधिकारी, नगर परिषद भडगाव
चाैकट’
काय म्हटलंय नोटिसीत?
नोटिसीत नमूद केलेले आहे की, प्रत्यक्ष पाहणीप्रमाणे आपण राहत असलेले घर, इमारत जुनी व पडाऊ आहे. पावसाळ्यातील अतिवृष्टीने केव्हाही इमारतीचा कोणता भाग कोसळेल याची शास्वती नाही. घर, इमारत कोसळून लगतच्या क्षेत्रांमध्ये जीवित वा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही नोटीस मिळाल्यापासून ३ दिवसांचे आत आपण आपले जुने, जीर्ण घर, इमारत, कोसळू शकणारा भाग काढून टाकावा. दुरुस्ती होण्यासारखा भाग त्वरित दुरुस्त करावा. घर, इमारतीचे पावसाळ्यात अतिवृष्टीने काही नुकसान झाल्यास त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल. तसेच इतर लगतच्या रहिवाशांना हानी झाल्यास त्यासाठीदेखील आपण जबाबदार राहाल. यात नगर परिषदेची कोणतीही जबाबदारी राहणार नाही. तसेच नुकसान झाल्यास त्याकरिता आपणास शासनाकडून अगर नगर परिषदेकडून कोणतीही मदत वा अर्थसाहाय्य मिळणार नाही.
===Photopath===
200621\20jal_3_20062021_12.jpg
===Caption===
भडगाव येथील जीर्ण इमारत.