रुग्णांशी अरेरावी करणाऱ्यास नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 12:02 PM2020-07-08T12:02:59+5:302020-07-08T12:03:23+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल : मनोबल वाढविण्यासाठी डॉक्टरांची धाव
जळगाव : कोविड रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या तरुणीला रुग्णालयातीलच कर्मचाºयाने अरेरावी केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री घडला. त्यानंतर हा प्रकार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना समजताच त्यांनी या तक्रारीचे तातडीने निरसन करीत तरुणीला धीर दिला़ या प्रकारात कर्मचाºयांना नोटीस बजावण्यात आली आहे़
कोरोनाबाधित एका महिला रुग्णाला एका कक्षातून दुसºया कक्षात न्यायचे होते़ या महिलेने वारंवार इकडून तिकडे का शिफ्ट करताय? अशी विचारणा केल्यानंतर कर्मचाºयांनी या महिलेशी अरेरावी केली़ या प्रकाराला घाबरून संबंधित तरूणीने हा प्रकार वडिलांना सांगितला़ त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते गजानन मालपुरे यांच्याकडे तक्रार केली़ त्यांनी तातडीने ही माहिती व फोटो जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पाठविले. रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी राऊत यांनी तातडीने या तक्रारीची दखल घेत डॉक्टरांना सूचना दिल्या. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ़ दत्तात्रय बिराजदार व निवासी डॉक्टर चव्हाण यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेत संबंधित बाधित तरुणीला धीर दिला़ त्यानंतर मंगळवारी दुपारी संबंधित कर्मचाºयाला बोलावून समज देण्यात आली. तसेच त्याला नोटीसही बजावण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ़ दत्तात्रय बिराजदार यांनी दिली़
जिल्हाधिकाºयांचे लक्ष
नियुक्ती झाल्यापासून जिल्हाधिकाºयांनी आठ ते दहा वेळा कोविड रुग्णालयात पाहणी करून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत़ त्यांनी दोन वेळा रात्री अचानक भेटी देऊन पाहणीही केली आहे़ यासह त्यांनी नातेवाईकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या असून सुरक्षा यंत्रणेला शिस्त लावली आहे़ पर्यवेक्षकाला थेट ठेका रद्द करण्याचा इशारा देण्यात आला होता़ त्यानुसार या ठिकाणी सुरक्षा कडक करण्यात आली आहे़
अधिकाºयांचे पूर्णवेळ नियंत्रण
कोविड रुग्णालयात सर्व कक्षांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे़ यातून अधिष्ठाता यांच्या कार्यालयातून लक्ष ठेवले जात असते़ शिवाय काही अधिकारी परवानगीनुसार त्यांच्या मोबाईलद्वारेही कक्ष व रुग्णालयातील हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून असतात़ नातेवाईकांची गर्दी, डॉक्टरांची व्हिजिट या बाबींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे़