सात नायब तहसीलदारांना नोटीस
By admin | Published: January 10, 2017 12:24 AM2017-01-10T00:24:54+5:302017-01-10T00:24:54+5:30
उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी सोमवारी सात नायब तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली
जळगाव : सातबारा संगणीकरणाच्या कामात दिरंगाई केल्याप्रकरणी महसूल उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी सोमवारी सात नायब तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सातबारा संगणीकरणाचे काम संथगतीने सुरु आहे. आतार्पयत केवळ 47.20 टक्के काम काम झाले आहे. जिल्ह्यातील एकूण 11 लाख 72 हजार 694 सव्र्हे आहेत. त्यातील एक लाख 87 हजार 775 सव्र्हे क्रमांक तलाठी यांनी कन्फर्म केले आहेत. त्यातील एडीट मोडय़ुलद्वारे तलाठी यांनी 5 लाख 66 हजार 389 सव्र्हे केले आहेत. तर मंडळ अधिकारी यांनी 3 लाख 65 हजार 788 सव्र्हे क्रमांक प्रमाणित केले आहेत. शनिवार 7 जानेवारी र्पयत 5लाख 32 हजार 848 सव्र्हेचे काम करण्यात आले आहे.
जळगाव नायब तहसीलदार डी.एस.भालेराव, भुसावळचे पी.बी.मोरे, अमळनेरचे के.एम.जोशी, जामनेरचे डी.पी. पाटील, बोदवडचे बी.डी. वाडिले, धरणगावचे तुषार बोरकर, एरंडोलचे सी.बी.देवराज या सात नायब तहसीलदारांना कामातील संथगती आढळून आली. या नायब तहसीलदारांचे काम हे 50 टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे भांडे-पाटील यांनी या सर्वाना सोमवारी कारणे दाखवा नोटीस काढत खुलासा मागविला आहे.