त्या' संशयास्पद ट्रकमधील तांदळाबाबत दुकानदाराला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:45+5:302021-07-07T04:19:45+5:30
चाळीसगाव : शनिवारी रात्री बाजार समितीच्या आवारात संशयास्पद आढळलेल्या ट्रकमधील तांदळाबाबत संबंधित दुकानदाराला बाजार समिती प्रशासनाने नोटीस बजावली असून ...
चाळीसगाव : शनिवारी रात्री बाजार समितीच्या आवारात संशयास्पद आढळलेल्या ट्रकमधील तांदळाबाबत संबंधित दुकानदाराला बाजार समिती प्रशासनाने नोटीस बजावली असून २४ तासात खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्या पत्राची प्र. तहसीलदारांनाही पाठविण्यात आली आहे. दरम्यान या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली होती. सोशल माध्यमासह परिसरातही विविध चर्चांना तोंडही फुटले आहे.
शनिवारी रात्री बाजार समितीत दहा चाकी ट्रक (एमएच १९ झेड ०८६०) हा संशयास्पदरित्या आढळून आला होता. याबाबत बाजार समितीचे प्रभारी सचिव सतीश पाटील यांनी रात्री उशिरापर्यंत बाजार समितीत थांबून प्राथमिक पंचनामा केला. या पंचनाम्यात ट्रक चालकाकडील पावत्या सील करण्यात आल्या आहे.
मंगळवारी बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळानेही याची तातडीने दखल घेत संबंधित दुकानदाला नोटीस बजावली आहे. नोटिसीत दुकानाराला तांदळाबाबत २४ तासात खुलासा सादर करण्याची स्पष्ट सूचना दिली आहे.
ट्रकमध्ये २६६ तांदळाच्या गोण्या
या ट्रकमध्ये एकूण २६६ तांदळाच्या गोण्या आढळून आल्या आहे. यात ट्रकमध्ये १७८ तर खाली आवारात ८८ गोण्या आढळल्या. तांदूळ गोण्यांचा हा एकूणच प्रकार संशयास्पद असून या प्रकारामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दुकानदाराच्या खुलाश्यानंतरच पुढील कार्यवाहीबाबत बाजार समितीचे प्रशासन निर्णय घेणार आहे. याप्रकरणात दुकानदार दोषी आढळल्यास त्याचा परवाना रद्द केला जाईल, अशी माहिती मुख्य प्रशासक दिनेश पाटील यांनी दिली आहे.