घातक रसायनांमध्ये फळे न पिकविण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:26 PM2019-04-05T12:26:47+5:302019-04-05T12:27:13+5:30
अन्न व औषध प्रशासनातर्फे बैठक
जळगाव : सध्या विविध फळांना मोठी मागणी असून ही फळे घातक रसायनांमध्ये पिकवू नका, अशा सूचना अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने फळ व्यापाऱ्यांना देण्यात आल्या.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) वाय.के. बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैठक घेतली. या वेळी त्यांनी घावूक फळ विक्रेत्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. फळांना मोठी मागणी असली तरी ती पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त फळे विकण्याची अपेक्षा न ठेवता व फळे पिकविण्यासाठी कॅल्शिअम कार्बाईड व अॅसिटिलीन गॅसचा वापर करू नये, अशा सूचना दिल्या.
उन्हाळा लागताच आंबा, केळी, पपई इत्यादी फळे झाडावरून काढून ती कृत्रिमरित्या पिकविण्याची प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे अनेकांना त्रासही सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून ही बैठक घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.