औरंगाबाद-धुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाची अधिसूचना जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:34 PM2018-02-12T12:34:58+5:302018-02-12T12:35:54+5:30
महामार्ग क्रमांक ५२ साठी भूसंपादन
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १२ - औरंगाबाद ते धुळे या नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ साठी चाळीसगाव तालुक्यात भूसंपादन करण्यात येणार असून संपादीत करण्यात येणाºया जमीन मालकांना भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या विषयीची अधिसूचना जारी करण्यात आली असून या विषयी २१ फेब्रुवारी पर्यंत दावे दाखल करता येणार आहे.
या चौपदरीकरणासाठी चाळीसगाव तालुक्यातील १४ गावांमधील एकूण २९.१२२७ हेक्टर जमीन संपादीत करण्यात येणार आहे. यामध्ये ा भरपाई किंमतीच्या निश्चितीची प्रक्रिया सुरू असून यावर दावे दाखल करता येणार आहे. त्यावर २१ फेब्रुवारी रोजी भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सकाळी ११ वाजेपासून सुनावणी सुरू होणार आहे.
या गावातील होणार भूसंपादन
बोढरे, रांजणगाव, चाळीसगाव, कोदगाव, पाटखडकी, खडकी बु., बिलाखेड, कारगाव, भोरस खुर्द, भोरस बु., दसेगाव बु., मेहुणबारे, खडकीसीम, दहिवद.