नोव्हेंबरमध्ये मध्य रेल्वेने केली ५.६५ दशलक्ष टन मालवाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:16 AM2020-12-06T04:16:51+5:302020-12-06T04:16:51+5:30

नोव्हेंबर २०१९ मध्ये केलेल्या ५.५८ दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत १.३% जास्त वाहतूक झाली आहे. ...

In November, Central Railway carried 5.65 million tonnes of freight | नोव्हेंबरमध्ये मध्य रेल्वेने केली ५.६५ दशलक्ष टन मालवाहतूक

नोव्हेंबरमध्ये मध्य रेल्वेने केली ५.६५ दशलक्ष टन मालवाहतूक

Next

नोव्हेंबर २०१९ मध्ये केलेल्या ५.५८ दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत १.३% जास्त वाहतूक झाली आहे. नागपूर विभागातून डोलोमाइट, कॉटन हस्क, कॉटन बियाणे, कडबा, तांदूळ आणि फ्लाय ॲश, भुसावळ विभागातील हस्क, पुणे विभागातील अ‍ॅग्रो आधारित अशा नवीन मालाची वाहतूक रेल्वेकडे वळविण्यासाठी विभागातील व्यवसाय विकास घटकांनी आक्रमकपणे मार्केटिंग केले आहे.

यावर्षी मध्य रेल्वेकडून ऑटोमोबाइलच्या रॅक्सची लोडिंग १५५ पर्यंत पोहोचली आहे. विविध टर्मिनल्समधून बांग्लादेशात वाहनांची निर्यात होणारी वाहतूक रेल्वेकडे वळविण्यात यश आले असून, ऑक्टोबर व नोव्हेंबर ३०हून अधिक रॅक्सची लोडिंग केली गेली. एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत कांद्याच्या १८२ रॅक्स लोड केल्या गेल्या. ही संख्या मागील वर्षभरात केलेल्या लोडिंगपेक्षा तुलनेत २५ रॅक्सनी जास्त आहे. या १८२ रॅक्सपैकी ७९ रॅक बांगलादेशात पाठविण्यात आले आहेत.

नोव्हेंबर २०२० मध्ये मुंबई विभागाने १,२५२ वॅगन्सची प्रतिदिन अशी सर्वाधिक लोडिंगची नोंद केली आहे.

भुसावळ विभागाने ऑक्टोबर २०२०मध्ये एनएमजीची सर्वाधिक २१ गाड्यांची नोंद केली आहे. नोव्हेंबरमध्येसुद्धा २१ रॅक्स असेच ठेवले.

किसान रेल ही अजूनही शेतकर्‍यांमध्ये लोकप्रिय होत आहे. किसान रेल्वेच्या आतापर्यंत ४१ ट्रिपमध्ये १३,५१३ टन नाशवंत व इतर वस्तूंची वाहतूक झाली आहे. जेऊर स्टेशनवरून प्रथमच २३ टन केळी भरली गेली. कोविड कालावधीत आतापर्यंत ६४९ पार्सल गाड्या चालविल्या गेल्या. भिवंडी, पंढरपूर, सांगोला, बेलवंडी, कोपरगाव, मोडलिंब, जेऊर, लासलगाव, वरुड ऑरेंज सिटी आदी स्थानकही पार्सल वाहतुकीला आकर्षित करीत आहेत.

Web Title: In November, Central Railway carried 5.65 million tonnes of freight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.