आता शहरवासीयांना मिळणार २४ तास पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 12:40 PM2020-01-01T12:40:02+5:302020-01-01T12:40:42+5:30

पिण्याचा पाण्याची समस्या मिटणार

Now the city dwellers will get 3 hours of water | आता शहरवासीयांना मिळणार २४ तास पाणी

आता शहरवासीयांना मिळणार २४ तास पाणी

Next

अजय पाटील 
जळगाव : सरत्या वर्षी जळगावकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाच्या जलाशयात मोठी घट झाली. त्यामुळे उन्हाळ्यात शहरवासियांचे मोठे हाल झाले. मात्र, २०२० मध्ये वाघूर धरणात पुरेसा जलसाठा तर आहेच, परंतु अमृत अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम देखील जुलैपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षापासून शहरवासियांना २४ तास पाणी उपलब्ध होणार आहे.
‘अमृत’मुळे जळगाव होणार ‘जलगाव’
डिसेंबर २०१७ पासून शहराच्या दृष्टीने महत्वपुर्ण ठरणाºया अमृत पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुुरुवात झाली. आतापर्यंत या योजनेचे ५० टक्के काम पुर्ण झाले असून, जुलै २०२० पर्यंत या योजनेचे पूर्ण काम होणार आहे. त्यासाठी नागरिकांना पाण्याच्या वापरानुसार (लिटरप्रमाणे) अर्थात विजबिलाप्रमाणे दराच्या स्लीपनुसार पाणीपट्टी भरावी लागणार आहे.
२५३ कोटी रुपयांची ही योजना असून, या योजनेमुळे शहरवाससियांना २४ तास पाणी मिळणार असल्याने जळगावकर खºयाअर्थाने ‘जलगाव’ होणार आहे.
अमृत योजनेतील जलवाहीन्या टाकण्याचे ६८ टक्के काम टाकून नळ कनेक्शन जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसºया टप्प्यात शहरातील सुमारे १ लाख नळांना इलेक्ट्रानिक्स मीटर लावले जाणार आहे. मीटरच्या माध्यमातून प्रत्येक मालमत्ताधारकांकडून वापरल्या जाण्याच्या पाण्याची नोंद ठेवली जाणार आहे. यामुळे पाण्याचीही बचत होणार आहे. जितकी गरज नागरिकांना असेल तेवढेच पाणी नागरिक यामुळे वापरतील.
इलेक्ट्रानिक्स मीटरवरुन पाण्याची नोंद घेण्यासाठी अद्यावत यंत्रणा तयार केली जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक नळ कनेक्शनच्या पाणीवापरचा डाटा या ठीकाणी असणार आहे. तसेच पाणीपट्टीची बिले ही वीज बिलांप्रमाणे राहणार आहे. शासनाच्या नियमानुसार एका व्यक्तीस १३५ लिटर पाणी या प्रमाणे कुटुंबाला लागणाºया एकूण पाण्याच्या एक कॉमन स्लिप राहील त्याच्या लिटर प्रमाणे दर राहील. त्याच्यावर पाणी वापरल्यास स्लप बदलणार असून त्यासाठी लिटरमागे जास्त दर राहणार आहे.
वाघूर धरणामुळे जळगावकरांना पाणी उपलब्ध होते. मात्र, अनेकदा नैसर्गिक अडचणींमुळे धरणातील जलसाठा कमी झाल्यास जळगावकरांना दोन किंवा तीनन दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागतो. तसेच सुप्रिम कॉलनीसारख्या भागात नेहमी पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. यावर्षी अमृत योजनेचे काम पुर्ण झाल्यास जळगावकरांना २४ तास पिण्याचे पाणी मिळणार आहे. तसेच पाण्याचा योग्य वापर होवून पाण्याचीही बचत होणार आहे.
-सीमो भोळे, महापौर

Web Title: Now the city dwellers will get 3 hours of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव