आता उत्सुकता निकालाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:12 AM2021-07-03T04:12:35+5:302021-07-03T04:12:35+5:30
कोरोना विषाणूने थैमान घातल्यामुळे मार्च-२०२० पासून शाळा बंद झाल्या. शाळा बंद पण, शिक्षण सुरू हे पध्दत अंमलात आणण्यात आली़ ...
कोरोना विषाणूने थैमान घातल्यामुळे मार्च-२०२० पासून शाळा बंद झाल्या. शाळा बंद पण, शिक्षण सुरू हे पध्दत अंमलात आणण्यात आली़ विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्यात आले. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात काही वर्ग विद्यार्थ्यांसाठी उघडण्यात आली़ पण, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्यानंतर शाळांची दारं विद्यार्थ्यांसाठी बंद झाली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होता. परिणामी, बाधितांसह मृत्यू होणा-यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले होते. बोर्डाची दहावीची परीक्षा होईल, अशी अपेक्षा असताना सीबीएसईची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली़ त्यानंतर निकाला कसा लावावा हा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर निकालाच्या मूल्यमापन पध्दती जाहीर करण्यात आल्या. आता शाळांनी गुणदानाची प्रक्रिया पूर्ण केली असून बोर्डाच्या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांची गुण अपलोड करण्यात आली आहे. आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. यंदाचा निकाला कसा असेल, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे. त्यानंतरचं अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा राबविण्यात येईल. ही परीक्षा सुध्दा शंभर गुणांची असेल़ त्यासाठी देखील काही निकष आखून देण्यात आले. दुसरीकडे बारावी निकालाची सुध्दा विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. शुक्रवारी बारावी निकालासाठी मूल्यमापन पध्दती जाहीर करण्यात आल्या आहेत़ त्यानुसार निकाल तयार केला जाईल. निकाला तयार करताता, शिक्षकांना सुध्दा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच दहावी निकालाची वाट न पाहता, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली याप्रमाणे इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रि येला देखील सुरू व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.