फिरणाऱ्यांवर आता ड्रोन कॅमेºयाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 09:44 PM2020-04-16T21:44:29+5:302020-04-16T21:44:34+5:30
वरणगाव पालिका : करणार दंड वसुली
दीपनगर, ता. भुसावळ : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र अनेक नागरीक संचारबंदी न पाळता बाहेरच फिरतांना दिसत आहेत. अशांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यासाठी वरणगाव नगर परिषद व पोलिस स्टेशन यांच्या संयुक्तरीत्या ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने चित्रीकरण केले जाणार आहे.
नागरीकांनी लॉकडाऊनच्यार् काळात घरांतच थांबावे असे आदेश असतांना देखील काही नागरीक काम नसताना घराबाहेर पडतात व दुकानदारही अत्यावश्यक सेवा नसताना दुकान उघडे करुन दुकानात बसतात. अशांवर कारवाईचा बडगा कायम राहणार आहे. याच अनुषंगाने नगर परीषदेचे मुख्याधिकारी शाम गोसावी, नगराध्यक्ष सुनिल काळे व वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिपकुमार बोरसे हे लक्ष ठेऊन आहेत.