नियोजनच्या निधीसाठी आता अटींचा नवीन तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:35 PM2020-02-03T12:35:39+5:302020-02-03T12:36:00+5:30

जळगाव : डिपीडीसीकडून मिळणाऱ्या निधीसाठी असलेल्या अटींमुळे हा निधीच खर्च होत नसल्याने अखेर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ...

Now a new set of terms for planning funds | नियोजनच्या निधीसाठी आता अटींचा नवीन तिढा

नियोजनच्या निधीसाठी आता अटींचा नवीन तिढा

Next

जळगाव : डिपीडीसीकडून मिळणाऱ्या निधीसाठी असलेल्या अटींमुळे हा निधीच खर्च होत नसल्याने अखेर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांचे दरवाजे ठोठावले असून येत्या सोमवारी ३ रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास बैठक होणार आहे़
बैठक घेण्याची विनंती काही सदस्यांनंी केली होती़ त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांच्या दालनात ही बैठक होणार आहे़ जिल्हा परिषदेला डिपीडीसीकडून मंजूर निधी व मिळणारा निधी यात तफावत असते, शिवाय एमबी, वर्क आॅर्डर, प्रशासकीय मान्यता, अनेक तांत्रिक बाबी यासह अनेक अटी या जाचक आहेत, त्यामुळे येणारा निधीच खर्च होत नाही व जिल्हा परिषदेची कामे थांबतात़ जिल्हा परिषद ही स्वतंत्र यंत्रणा असताना डिपीडीसीने केवळ निधी द्यावा व यातून मार्ग काढावा अशी मागणी पदाधिकारी करणार असल्याची माहिती आहे़
जलशक्तीच्या निधीबाबत होणार चर्चा
शिवाय गेल्या काही दिवसांपासून जलशक्ती अभियानाच्या सात कोटी ३९ लाख रूपयांच्या निधीचा तिढा निर्माण झाला असून हा निधी स्वतंत्र नसून बचतीच्या निधीतून हा खर्च करायचा आहे़
अशा स्थितीत केवळ यावल, रावेर मध्ये कामे घेऊन त्याचा अन्य कामांवर परिणाम करून अन्य तेरा तालुक्यांवर अन्याय होत असल्याचा सूर सदस्यांमधून उमटत आहे, याबाबतही या तासाभराच्या बैठकीत चर्चा होऊन हा तिढा सोडविण्यात येणार आहे़ सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील, अतिरिक्त सीईओ विनोद गायकवाड यांचीही या बैठकीला उपस्थिती असेल़

Web Title: Now a new set of terms for planning funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.