आता नॉन कोविड रुग्णाचेही होणार शवदाहिनीत अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:16 AM2021-04-04T04:16:39+5:302021-04-04T04:16:39+5:30
जळगाव : शहरातील नेरी नाका वैकुंठधाममध्ये केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने बसविण्यात आलेल्या शवदाहिनीमध्ये नॉन कोविड रुग्णांवरही आता अंत्यसंस्कार करता येणार ...
जळगाव : शहरातील नेरी नाका वैकुंठधाममध्ये केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने बसविण्यात आलेल्या शवदाहिनीमध्ये नॉन कोविड रुग्णांवरही आता अंत्यसंस्कार करता येणार आहे.
शवदाहिनीत गेल्या २ महिन्यांत १२५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. २८ मार्च रोजी शवदाहिनी तांत्रिक दुरुस्तीकरिता फक्त १ दिवस बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर, शवदाहिनी पूर्ववत कार्यरत झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दररोजचे होणारे मृत्यू व अंत्यसंस्कार करण्याकरिता जागेची कमतरता असल्याने, महापालिका प्रशासनाने नेरी नाका स्मशानभूमी पूर्णपणे कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्यासाठी राखीव ठेवली आहे. दरम्यान, आता शवदाहिनीमध्ये कोरोना व सामान्य निधन झालेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार केले जात असल्याची माहिती केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी नेरी नाका वैकुंठधामध्ये शवदाहिनी सहायक मयूर सपकाळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.