रेल्वेत आता पेपरलेस अनारक्षित टिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 11:10 PM2018-10-08T23:10:13+5:302018-10-08T23:11:38+5:30
भुसावळ, जि.जळगाव : रेल्वे प्रशासनाने खर्च कमी करण्यासाठी पर्यावरण वाचविण्यासाठी पेपरलेस तिकीट उपयोगात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी १२ आॅक्टोबरपासून होणार आहे.
यासाठी युटीएस अॅप्लिकेशनद्वारे अनारक्षित तिकीट काढण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिली जाणार आह. याचा लाभ रेल्वे स्थानकाच्या पाच किलोमीटरच्या परिघात घेता येणार नाही.
मोबाईलवर प्रवाशांना रेल्वे प्रवासाचे तिकीट संदेशद्वारा प्राप्त होणार आहे. या माध्यमातून रेल्वेच्या तिकिटासाठी लागणाऱ्या कागदावरील खर्चात कपात होणार आहे.
शिवाय कॅशलेस व्यवहार आला. या माध्यमातून चालनादेखील मिळणार आहे. प्रवाशांनी याचा जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.