आता सहा तालुके ५०च्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:12 AM2021-06-19T04:12:39+5:302021-06-19T04:12:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काही दिवसांपूर्वी चार तालुक्यांची सक्रिय रुग्णसंख्या ही ५० पेक्षा कमी नोंदविण्यात आली होती. यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : काही दिवसांपूर्वी चार तालुक्यांची सक्रिय रुग्णसंख्या ही ५० पेक्षा कमी नोंदविण्यात आली होती. यात दोन तालुक्यांची भर पडली असून, सहा तालुक्यांमध्ये ५० पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. यातील भडगाव तालुक्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल केल्याची दिलासादायक स्थिती आहे. दरम्यान, शुक्रवारी शहरात ७ नवे कोरेानाबाधित आढळून आले आहे. १४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव ग्रामीणमध्येही ५ रुग्ण असून, ४५ वर्षीय बाधिताचा मृत्यू झाला आहे.
जिल्हाभरातच कोरोना रुग्णसंख्या घटली आहे. यात शुक्रवारी दुसऱ्या लाटेतील निच्चांकी ५३ रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यातील भडगाव, अमळनेर, बोदवड, पारोळा, धरणगाव, चोपडा या तालुक्यात ५० पेक्षा कमी रुग्ण आहे, तर चाळीसगाव तालुका वगळता सर्वच तालुक्यांत २०० पेक्षा कमी रुग्ण आहेत.