आता ट्रकमधून वाळूची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 09:58 PM2019-11-26T21:58:59+5:302019-11-26T21:59:09+5:30

वाळूमाफियांची नवी शक्कल : पोलिसांच्या अहवालावर महसूलकडून कारवाई नाही

Now smuggled sand from the truck | आता ट्रकमधून वाळूची तस्करी

आता ट्रकमधून वाळूची तस्करी

Next

जळगाव : कारवाई टाळण्यासाठी वाळू माफियांनी आता ताडपत्री झाकलेल्या ट्रकमधून वाळूची तस्करी करायला सुरुवात केली आहे. एमआयडीसी पोलिसांनी अयोध्या नगरात असा वाळूचा ट्रक पकडला आहे. एका ठिकाणी या ट्रकमधून वाळू उपसली जात असतानाच हा ट्रक जप्त केला. त्याबाबतचा अहवाल तहसीलदारांना पाठविला, मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
शहरात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अवैध वाळूची तस्करी सुरु आहे. आव्हाणे, धानोरा, वडनगरी, निमखेडी, फुपनगरी, खेडी या भागातून दिवसरात्र वाळूचा उपसा सुरु असून ट्रॅक्टर व डंपरद्वारे त्याची वाहतूक केली जात आहे. दुसरीकडे गस्तीवर पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीचे वाहने पकडली तरी त्यावर महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याने नेमके पाणी कुठे मुरतयं असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या आठवड्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विशाल वाठोरे यांनी अयोध्या नगरात ताडपत्री झाकलेला वाळूचा ट्रक (क्र.एम.एच.१९ जे. ९०५) पकडला होता. हा ट्रक पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे, गुन्हा दाखलपेक्षा दंडात्मक कारवाई मोठी असल्याने पोलिसांनी तहसीलदारांकडे ट्रक व वाळूचा अहवाल पाठविला,मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.
अहवाल तीन महिन्यापासून पडून
सहायक फौजदार आनंदसिंग पाटील यांनी ३० आॅगस्ट रोजी पहाटे पाच वाजता कोम्बींग आॅपरेशनच्यावेळी मेहरुण भागात विना क्रमांकाचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले होते. या टॅÑक्टर चालकाकडे वाहन परवाना, गौण खनिज परवाना व इतर कोणतेच कागदपत्रे नव्हते. चालकाचे नाव सुधाकर विनोद सपकाळे (३६, रा.खेडी कढोली, ता.एरंडोल) असे निष्पन्न झाले. आनंदसिंग पाटील यांनी त्याच दिवशी महसूल विभागाला कळवून तलाठ्याच्या ताब्यात ट्रॅक्टर दिले त्यानंतर तहसीलदारांना लेखी अहवाल सादर केला. या ट्रॅक्टरचे पुढे काय झाले त्याची काहीच माहिती देण्यात आली नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

-याआधी देखील पोलिसांनी पकडलेले वाहने महसूल विभागाने परस्पर सोडून दिल्याचा प्रकार घडला आहे. थेट जिल्हाधिकारी कार्यालयातूनही वाहने पळविण्यात आली आहेत.
-वाळू माफियांची महसूल, पोलीस व आरटीओ या तिन्ही विभागातील काही मोजक्या अधिकाऱ्यांशी मिलिभगत असल्याचा संशय असून काहींची तर थेट भागीदारीच आहे.वाळूत भागीदारी असलेल्या पोलिसांवर याआधी कारवाया झाल्या आहेत तर अजूनही काही पोलीस सक्रीय आहेत. दुसºयाच्या नावावर डंपर घेऊन हा व्यवसाय सुरु केला आहे.

Web Title: Now smuggled sand from the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.