आता एसटीचेही समजणार लाईव्ह ‘लोकेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 11:57 AM2019-11-10T11:57:21+5:302019-11-10T11:58:28+5:30

संडे अँकर । जळगाव आगारात बसेसवर जीपीएस यंत्रणा बसविण्यास सुरुवात

 Now ST will also understand live 'location' | आता एसटीचेही समजणार लाईव्ह ‘लोकेशन’

आता एसटीचेही समजणार लाईव्ह ‘लोकेशन’

Next


सचिन देव ।
जळगाव :रेल्वे प्रमाणे आता एसटीचेही समजणार लाईव्ह ‘लोकेशन’जळगाव आगार : बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसवायला सुरुवातअजळगाव : स्थानकातून निघालेली बस आता नेमकी कुठे आहे, ती केव्हा येईल, वेळापत्रकानुसार बस धावते आहे का.. आदी सर्व माहिती एका क्लिकवर रेल्वे प्रमाणे लालपरीच्या प्रवाशानांही घर बसल्या पाहायला मिळणार आहे. ही यंत्रणा सुरु करण्यासाठी जळगाव आगारातील बसेसमध्ये नुकतीच जीपीएस यंत्रणा बसवायला सुरुवात झाली आहे.
गावी जातांना बऱ्याचदा प्रवाशांना गाडीची वाट पाहत स्थानकातच ताटकळत बसावे लागते. संबंधित गावाला जाण्यासाठी नेमकी बस केव्हा आहे, हे समजण्यासाठी आगारात जाऊन चौकशी करावी लागते. यामध्ये प्रवाशांचा वेळही वाया जातो. त्यामुळे एसटी महामंडळाने प्रवाशांचा हा त्रास दुर व्हावा आणि प्रवाशांना रेल्वे प्रमाणे एखाद्या गावाला जाण्यासाठी किती वाजता बस आहे ,हे समजण्यासाठी ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम’ सुरु केली आहे. या अत्यानुधिक यंत्रणेचा राज्यातील पहिला प्रयोग नाशिक आगारात सुुरु करण्यात आला. या ठिकाणी ही यंत्रणा यशस्वी झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने राज्यातील सर्व महत्वाच्या आगारामध्ये राबविण्यात सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील जळगाव आगाराचा समावेश आहे.
स्थानकात बसविणार एलसीडी स्क्रिीन बोर्ड
रेल्वे स्टेशनवर ज्या प्रमाणे गाडीचे नाव, तिची येण्याची वेळ व गाडी क्रमांक दाखविणारे डिजिटल स्क्रिीन बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यामुळे जळगाव बस स्थानकातही बाहेरुन येणारे बस, तिचा क्रमांक व कुठे जाणार, याची प्रवाशांना माहिती होण्यासाठी डिजिटल स्क्रिीन बोर्ड लावण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना स्थानकातूनही बसेसची स्थिती समजू शकणार आहे.

Web Title:  Now ST will also understand live 'location'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.