पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगावातील सभास्थळाचा एनएसजीने घेतला ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:38 PM2019-10-12T12:38:20+5:302019-10-12T12:38:52+5:30
इन कॅमेरा मैदानाचे सपाटीकरण; विमानतळ ते सभा स्थळापर्यंतच्या रस्ता दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवार १३ रोजी जळगाव विमान तळासमोरील मोकळ््या जागेत जाहीर सभा होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षिततेच्या द्दष्टीकोनातून एनएसजीच्या (नॅशनल सेक्युरिटी गार्ड) सशस्त्र कमांडोचा सभास्थळी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात सभास्थळाच्या मैदानाचे इनकॅमेरा सपाटीकरण सुरु आहे.
मोदी यांच्या राज्यभरात ठिकठिकाणी सभा होणार आहेत. याचा शुभारंभ उद्या जळगावातून होत आहे. विमान तळासमोरील १०० एकर जागेवर सकाळी साडेदहा वाजता ही सभा होत आहे.
सभास्थळाच्या मैदानाचे गेल्या तीन दिवसापासून जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरण करण्यात येत आहे. ठिकठिकाणची काटेरी झाडे व झुडपे तोडण्यात येत आहेत.
विमानतळाच्या बाहेर महामार्गालगतच २०० मीटर आत ही सभा होत असून, विमानतळ ते सभा स्थळापर्यंतच्या रस्त्याची दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. रस्त्यातील झुडपे तोडण्यात आली असून, खड्डेही बुजविण्यात आले आहेत.
मोदी यांच्या सुरक्षिततेसाठी विमानतळावर आणि सभास्थळी एनएसजीच्या कमाडोंचे विशेष पथक शस्त्रासह तैनात करण्यात आले आहे.
एनएसजीचे कमांडो तीन दिवसापासूनच शहरात दाखल झाले आहेत. एनएसजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेचा आढावा घेऊन, विमानतळ आणि सभास्थळ ताब्यात घेतले आहेत.