एनटीव्हीएसला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:51 AM2017-09-25T00:51:22+5:302017-09-25T00:56:06+5:30

आंतरमहाविद्यालयीन अभिरूप न्यायालय स्पर्धा : जळगावचे मणियार महाविद्यालय द्वितीय

NTVS wins title | एनटीव्हीएसला विजेतेपद

एनटीव्हीएसला विजेतेपद

Next
ठळक मुद्देजळगावचे एस़एस़ मणियार विधी महाविद्यालय द्वितीयशनिवारी झाली ही स्पर्धा़एकूण सहा संघांनी घेतला होता सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन अभिरूप न्यायालय स्पर्धेत नंदुरबारच्या एनटीव्हीएस विधी महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले, तर जळगावचे एस़एस़ मणियार विधी महाविद्यालय द्वितीय ठरले़
एस़एस़ मणियार विधी महाविद्यालयात शनिवारी ही स्पर्धा झाली़ उपधर्मादाय आयुक्त जी़एस़ जोशी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले़ या वेळी के़सी़ई सोसायटीचे सचिव अ‍ॅड़ एस़एस़ फालक, महाविद्यालय विकास समिती सदस्य अ‍ॅड़ प्रमोद पाटील, प्राचार्य डॉ़ बी़ युवाकुमार रेड्डी, अ‍ॅड़ गिरीश नागोरी, अ‍ॅड़ सूरज जहांगीर, अ‍ॅड़ सौरभ मुंदडा, प्रा़विद्या पाटील, प्रा़आशिष गांगुर्डे, प्रा़भव्या मारथी उपस्थित होते़ प्रास्ताविकात प्राचार्य रेड्डी यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमांबाबत माहिती दिली़ जी़एस़ जोशी, अ‍ॅड़ फालक, अ‍ॅड़ प्रमोद पाटील यांनी मूट कोर्टसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़
सूत्रसंचालन माधुरी चौधरी व डॉली मोतीरामानी यांनी, तर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा़जी़व्ही़धुमाळे यांनी आभार मानले़ यशस्वितेसाठी प्रा़रेखा पाहुजा, प्रा़योगेश महाजन, डॉ़ विजेता सिंग, प्रा़अंजली बोंदर यांनी परिश्रम घेतले़
विजेते असे
१ अभिरूप न्यायालय स्पर्धेत धुळे येथील ३, नंदुरबार येथील १ व मणियार विधी महाविद्यालयातील दोन असे एकूण सहा संघ सहभागी झाले होते़ घटस्फोटाच्या खटल्यावर स्पर्धा झाली़
२ यात बेस्ट मेमोरियलचे पारितोषिक नंदुरबार एनटीव्हीएस विधी महाविद्यालयाच्या संघानेच मिळवले़ उत्कृष्ट विद्यार्थी वकिलाचे प्रथम पारितोषिक धुळे येथील बियाणी महाविद्यालयाच्या नरेंद्र देशपांडे, तर द्वितीय धुळे येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या मोक्षा कोचर हिने पटकावले़ मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले़


 

Web Title: NTVS wins title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.