शहरातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या हजाराच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:16 AM2021-05-19T04:16:54+5:302021-05-19T04:16:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. परिणामी २६ फेब्रुवारीनंतर मंगळवारी ...

The number of active patients in the city is within a thousand | शहरातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या हजाराच्या आत

शहरातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या हजाराच्या आत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. परिणामी २६ फेब्रुवारीनंतर मंगळवारी पहिल्यांदाच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या एक हजारापेक्षा कमी झाली आहे. मंगळवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार जळगाव शहरा ९८५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर जिल्हाभरात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्याही ९५०१ आहे.

मंगळवारी जिल्ह्यात ६६५ जण कोरोनातून बरे झाले तर ५२१ नवे बाधित आढळून आले आहे. नव्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील कमी झाली आहे. त्यासोबतच दिवसभरात ११ बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव शहरातील पाच जणांचा समावेश आहे.

दिवसभरात ७ हजार ४७२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातून ५२१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

शहरात पाच जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मंगळवारी बरे होणाऱ्यांची संख्या १३५ होती. तर ५१ जण नवे बाधित आढळून आले आहेत. बाधितांची संख्या कमी होत असली तरी मृत्यूंची संख्या मात्र कमी झालेली नाही. मंगळवारी पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. हे सर्व मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यलयातच झाले आहे.

जीएमसीत एकाच दिवसात ११ मृत्यू

जळगाव जिल्ह्यात मंगळवारी कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वच्या सर्व मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यलायातच झाल्याचे जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. त्या धरणगाव तालुक्यातील ३४ वर्षांच्या महिलेचा देखील समावेश आहे. आजच्या या ११ मृत्यूंसोबतच आतापर्यंत जीएमसीत वर्षभरात ९५३ जणांचा मृत्यू झाला.

उपचार घेत असलेले रुग्ण

१४ फेब्रुवारी १८७

२५ फेब्रुवारी ९४४

२६ फेब्रुवारी १०२१

१७ मे १०७४

१८ मे ९८५

Web Title: The number of active patients in the city is within a thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.