ॲक्टिव्ह रुग्णसंख्या अडीच हजारांच्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:12 AM2021-06-10T04:12:25+5:302021-06-10T04:12:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात बुधवारी उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही अडीच हजारांच्या आत आली आहे. बुधवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात बुधवारी उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही अडीच हजारांच्या आत आली आहे. बुधवारी जिल्ह्यात १०६ नवे रुग्ण आढळून आले, तर २६१ जण बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही २,४६१ झाली आहे. त्यातही लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ही १,७७७ आहे. तर ऑक्सिजन वायू सुरू असलेले रुग्ण ३९८, आयसीयूत दाखल असलेले रुग्ण १६७ आहेत, तर जळगाव जिल्ह्यात एका ४७ वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहरात दिवसभरात २६ नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर बरे होणाऱ्यांची संख्या २५ आहे. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही २२४ झाली आहे. त्यासोबतच जळगाव ग्रामीणमध्ये ५ नवे बाधित आढळून आले आहेत.
अमळनेर - धरणगावला एकही नवा रुग्ण नाही
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या एकेरी आकड्यांवर आली आहे, तर अमळनेर आणि धरणगावमध्ये बुधवारी कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही, तसेच या दोन तालुकांमध्ये ॲक्टिव्ह रुग्णसंख्याही शंभरच्या आत आहे.
चाचण्या सहा हजारांच्या वर
रुग्णसंख्या कमी होत असली, तरी प्रशासनाने चाचण्यांची संख्या कमी केलेली नाही. बुधवारी ३ हजार २२८ आरटीपीसीआर चाचण्या केल्या आहेत, तर रॅपिड अँटिजन चाचण्या २ हजार ९५५ करण्यात आल्या.