एरंडोल तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येने पार केले अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 07:44 PM2020-06-14T19:44:33+5:302020-06-14T19:45:27+5:30

तालुक्यात दोन बळी

The number of corona-infected patients in Erandol taluka has crossed half a century | एरंडोल तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येने पार केले अर्धशतक

एरंडोल तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येने पार केले अर्धशतक

Next



एरंडोल: गेल्या तीन आठवड्यांमध्ये एरंडोल तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ५१ झाली आहे. पैकी २२ रुग्ण उपचार घेऊन बरे झाल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे दोन बळी गेले आहेत. अ‍ॅक्टिव्ह केसेस २७ आहेत. एरंडोल कोविंड केअर सेंटरमध्ये १५ रुग्णांवर उपचार होत आहे. तर जळगाव केअर सेंटर मध्ये ११ जण दाखल आहेत. तसेच १ रुग्ण नाशिक येथे उपचार घेत आहे.
रविवारी तालुक्यात नव्याने ७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यात एरंडोल येथील जोरी गल्लीतील १६ वर्षीय मुलगा, ३५ वर्षीय पुरुष, व ६० वर्षीय महिला यांचा समावेश आहे. ग्रामीण भागात फरकांडे येथे ३३ वर्षीय महिला ,३६ वर्षीय महिला हे नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय अंतुर्ली येथे ५६ वर्षीय महिलाव ३० वर्षीय महिला हे दोन नवे रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान रविवारी एरंडोल कोविंड केअर सेंटर मधून ७ पॉझिटिव्ह रुग्णांना लक्षणे नसल्यामुळे दहाव्या दिवशी यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी व तहसीलदार अर्चना खेतमाळीस , डॉ. फिरोज शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील , डॉ. रोहित वाणी, डॉ. राकेश झोपे आदींनी त्यांना गुलाब पुष्प देऊन निरोप दिला.

Web Title: The number of corona-infected patients in Erandol taluka has crossed half a century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.